Rajan Teli joins Chief Minister Eknath Shinde’s Shiv Sena after quitting UBT faction — his sixth major political switch in Maharashtra politics. sarkarnama
कोकण

Maharashtra Politics : पाचव्यांदा पक्षांतर, ठाकरेंच्या नेत्याची एकनाथ शिदेंना साथ, कोकणातील राजकारण बदलणार!

Rajan Teli Joins Eknath Shinde Shiv Sena : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तळकोकणात मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणूक लढणारे त्यांच्या पक्षाचे उमेदवार राजन तेली यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

Rajan Teli Politics : दसरा मेळाव्यात ठाकरेंची तोफ धडाडत असताना तळ कोकणात त्यांना जोरदार झटका बसला. विश्वासाने ज्याला विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली त्याच नेत्याने ठाकरेंचा हात सोडत एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा पक्ष बदलण्याचा विक्रमही या नेत्यांच्या नावावर झाला.

राजन तेली यांनी दसऱ्याच्याच मुहूर्तावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तेली यांच्या या निर्णयाने तळकोकणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांनी आपले कट्टर विरोधत दीपक केसरकर यांच्यासोबत शिवसेनेते काम करावे लागणार आहे. शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणाऱ्या तेलींनी शिवसेनातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आता एकनाथ शिंदेंची शिवसेना अशा तब्बल सहा पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. पाचव्यांना पक्षांतर करत ते सहाव्या पक्षामध्ये गेले आहेत.

तेली हे सिंधूदुर्गाच्या राजकारणात नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. त्यानंतर त्यांनी राणेंसोबत शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, पुढे त्यांचे आणि राणेंचे राजकीय संबंध बिघडले आणि ते राणेंचे राजकीय विरोधक म्हणून पुढे आले, दीपक केसरकर यांच्याविरोधात ते विधानसभा निवडणुकीत दोनदा मैदानात उतरले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपची साथ सोडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

भाजपमध्ये प्रवेश

शिवसेना, काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस राजन तेली यांनी 2014 च्या विधानसभेच्या तोंडावर भाजपमध्ये आले. यावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवत भाजपने त्यांना राज्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. पण राणे यांच्या आधीच भाजपमध्ये दाखल झालेले तेली यांची राणेंच्या प्रवेशानंतर घुसमट वाढली. तर 2019 च्या विधानसभेच्या तोंडावर त्यांच्यात आणि नारायण राणे यांच्यात संबंध बिघडले. त्यांनी राणेंवर परखड शब्दांत टीका केली. राणेंसोबत शिवसेना सोडून आपण चूक केल्याचे म्हणत भाजपची साथ सोडली होती. त्यानंतर ते राणे याचे विरोधक म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

भाजपची साथ सोडली

ऐन 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलींनी भाजप सोडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पुन्हा एकदा त्यांचा सामना शिवसेनेच्या दीपक केसरकर यांच्याविरोधात झाला. मात्र, शिंदेसेनेच्या केसरकर यांनी त्यांचा 39 हजार 899 मतांनी पराभव केला. तेली यांना 41 हजार 109 मतं मिळाली.

एकनाथ शिंदेंना साथ

दसरा मेळ्यात तेली यांनी उद्धव ठाकरेंचा हात सोडत आठ महिन्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता त्यांना ज्या राणेंशी वैर घेतलं त्यांचे सुपूत्र निलेश राणे हे देखील शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे तेलींना निलेश राणेंषी मिळते जुळते घ्यावे लागणार आहे. मात्र त्यांच्या या प्रवेशामुळे आगामी स्थानिकच्या आधी तळकोकणात राजकीय गणितं बदलताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT