थोडक्यात बातमीचा सारांश :
अनिल परब यांनी विधानपरिषदेत सावली बार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचा आरोप केला.
रामदास कदम यांनी या आरोपांना उत्तर देत बार आपलाच असल्याचे जाहीरपणे कबूल केले.
या प्रकरणामुळे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष चिघळण्याची शक्यता वाढली आहे.
Ratnagiri News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी (ता. 18) विधानपरिषदेत पुन्हा एकदा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाना साधला. मुंबई झालेल्या सावली बारवरील पोलिसांच्या कारावाईनंतर परब यांनी तो बार कदम यांच्या आईच्या नावाने असल्याचा आरोप केला. यावरून आता खळबळ उडाली असून या आरोपांना रामदास कदम यांनी थेट उत्तर दिले आहे. तसेच त्यांनी हा आपल्याच मालकीचा असल्याची कबुलीही दिली आहे. यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. (Political storm intensifies in Maharashtra as Ramdas Kadam confesses owning 'Savali Bar' following Anil Parab's accusations against his son)
कांदिवली येथील सावली बारवर पोलिसांनी धाड मारत बावीस बारबालांसह ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. यानंतर गुन्हाही दाखल केला. पण आता दाखल झालेल्या एफआयआरवरून गोंधळ उडाला आहे. याच कारवाईनंतर हा बार योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असल्याचे समोर आले आहे. यामुद्द्यावरून परब यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ज्यावर आता योगेश कदम यांचे वडील व माजी मंत्री रामदास कदम यांनी पलटवार केला आहे. तसेच त्यांनी हा बार आपल्याच मालकीचा असल्याची कबुलीही दिली आहे.
यावेळी कदम यांनी, “अनिल परब हे अर्धवट वकील असून या अर्धवट वकिलाच्या सल्ल्यानेच उद्धव ठाकरे चालतात. त्यामुळेच शिवसेनेची सध्याची अवस्था अशी झाली आहे. होय सावली बार आमच्या मालकीचा आहे. पण गेल्या 30 वर्षांपासून तो शेट्टी नावाचा इसम चालवत आहे. जे खरं आहे. पण परब म्हणतात तसे हॉटेल आणि बारचा परवाना माझ्या पत्नीच्या नावानेच असून तिच्याच नावे ऑर्केस्ट्राचा परवाना देखील आहे. तेथे असणाऱ्या मुलींचं वेटरचं लायसन्स देखील आमच्याकडे आहे.
मात्र परब यांचा दावा खोटा आहे. तेथे काहीही अनधिकृत होत नाही. तसेच काहीही अनधिकृतपणे डान्स बार चालत नाही.” पण आता तेथे जी कारवाई झाली ती एका ग्राहकाने तिथल्या मुलीवर पैसे उधळल्याने. ही गोष्ट मला कळाली त्याचवेळी ऑर्केस्ट्रा व मुलींचं लायसन्स पोलिसांना दिलं असून हॉटेल बंद केलं आहे. मला असल्या पैशांची गरज नाही.
त्यामुळेच मी परब यांनी अर्धवट वकील असे म्हटलं असून ते पुरेशी माहिती घेत नाहीत आणि देतही नाहीत. त्यांना कायदा नीट माहित नाही. बार मालक हा केवळ दारूबाबत जबाबदार असतो. मात्र, डान्स व इतर गोष्टींसंदर्भात मालकाला जबाबदार धरता येत नाही, असाही दावा कदम यांनी केला आहे.
डान्सबार व हॉटेल संदर्भातील करारनाम्यात आधीच स्पष्ट असून हॉटेल व बार चालवायला दिल्यानंतर तिथे घडणाऱ्या सर्व बाबींसाठी मूळ मालक जबाबदार नसतो. ज्याने ते घेतलेलं आहे, तो असतो. परंतु त्या अर्धवट वकिलांना या नियमाची माहितीच नाही. त्यांनी आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मी देखील वकिलांचा सल्ला घेऊन परब यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करता येता की नाही याची माहिती घेणार असल्याचे म्हटलं आहे.
परब यांनी याच्याआधी देखील दापोलीमध्ये असेच राजकारण केले होते. त्यांनी मला, योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न केला. योगेशला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांना पुरूण उरलो. पण आता ते तसाच कुटील डाव विधिमंडळात खेळत आहेत. चुकीची माहिती देऊन, चुकीची कलमं सांगून, चुकीचे नियम सांगून आम्हाला बदनाम करत आहेत. पण ते खरं नाही. याबाबत विधिमंडळाच्या अध्यक्षांना पत्र लिहिणार असून परब यांच्यावर कारवाई करणार असल्याचेही रामदार कदम यांनी म्हटलं आहे.
प्र.1: अनिल परब यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर पुन्हा कोणता आरोप केला आहे? उ.1: अनिल परब यांनी मुंबईतील 'सावली बार' हा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असल्याचा आरोप केला आहे.
प्र.2: 'सावली बार'वर कोणत्या प्रकारची कारवाई झाली होती? उ.2: मुंबईतील 'सावली बार'वर पोलिसांची कारवाई झाली होती.
प्र.3: अनिल परब यांच्या आरोपांना कोणी उत्तर दिले आहे? उ.3: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या आरोपांना थेट उत्तर दिले आहे.
प्र.4: रामदास कदम यांनी सावली बारबद्दल काय कबुली दिली आहे? उ.4: रामदास कदम यांनी 'सावली बार' हा आपल्याच मालकीचा असल्याची कबुली दिली आहे.
प्र.5: या कबुलीमुळे या वादावर काय परिणाम होण्याची शक्यता आहे? उ.5: रामदास कदम यांच्या कबुलीमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.