Shambhuraj Desai VS Anil Parab : 'तू मंत्री असताना बूट***, गद्दार कोणाला म्हणतो तू बाहेर ये...', शंभूराज देसाई अनिल परब सभागृहात भिडले, एकमेकांची पारच काढली!

Maharashtra assembly monsoon session Shambhuraj Desai Anil Parab : शंभूराज देसाई बोलत असतानाच अनिल परब यांनी तुम्ही देखील त्या मंत्रीमंडळात मंत्री होता. मंत्री असताना गद्दारी केली, असे म्हटले आणि मोठा वाद झाला.
Tense moments as Shambhuraj Desai and Anil Parab argue during the Maharashtra Legislative Council session.
Tense moments as Shambhuraj Desai and Anil Parab argue during the Maharashtra Legislative Council session.sarkarnama
Published on
Updated on

Desai VS Parab : पावसाळी अधिवशेनाच्य बुधवारच्या कामकाजावेळी विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई एकमेकांशी तुफान भिडले. सभागृहात एकमेकांवर तुटून पडत असताना दोघांनी भाषेची मर्यादा ओलंडली. परब यांनी शंभूराज देसाई यांचा सभागृहात "तू मंत्री असताना गद्दारी केली" असा उल्लेख केला. त्यानंतर शंभूराज देसाई यांचा देखील पार चढला. त्यांनी तू बाहेर ये तुला दाखवतो, असे प्रतिआव्हान अनिल परब यांना दिले.

मराठी माणसाला मुंबईत रिडेव्हलमेंट होत असताना नवीन इमारतीमध्ये 40 टक्के जागा राखीव मिळायला हव्यात, अशी मागणी अनिल परब यांनी करत मराठी माणसाला घर मिळावे म्हणून सरकारचे काही धोरण नसल्याचे तसेच कायदा नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी 2019 मध्ये तुमचे सरकार होते तेव्हा का कायदा केला नाही. तुम्ही काही केलं नाही, हे ऑन रेकाॅर्ड मान्य करा, असा प्रतिहल्ला चढवला.

शंभूराज देसाई बोलत असतानाच अनिल परब यांनी तुम्ही देखील त्या मंत्रीमंडळात मंत्री होता. मंत्री असताना गद्दारी केली. मंत्रिपसाठी बूट***ले असा उल्लेख केला. त्यावर कुणाल म्हणतो गद्दार? बाहेर ये तुला दाखवतो. कोणाला गद्दार म्हणतोय, असे आव्हान अनिल परबा यांना दिले.

Tense moments as Shambhuraj Desai and Anil Parab argue during the Maharashtra Legislative Council session.
Pune Congress : पुण्यात काँग्रेसला तिसरा झटका... थोपटे, धंगेकरांनंतर आणखी एका माजी आमदाराचा रामराम निश्चित!

सभागृहाचे कामकाज तहकूब

अनिल परब आणि शंभूराज देसाई हे एकमेकांना भिडले असताना सभागृहात एकच गोंधळ झाला. मराठी माणसाच्या मुद्यावर चर्चा सुरू असताना वाद नको, असे आवाहन देखील काही सभासद करत होते. तर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दोन्ही नेत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, दोघांचा आवाज वाढल्याने एकच गोंधळ झाला त्यामुळे गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

Tense moments as Shambhuraj Desai and Anil Parab argue during the Maharashtra Legislative Council session.
BJP President Election : भाजप अध्यक्ष निवडीसाठी RSS ने सेट केलाय फॉर्म्यूला? हवाय असा धडाकेबाज नेता...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com