Ramdas Kadam News Sarkarnama
कोकण

Ramdas Kadam Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना राजकारणातून उध्वस्त करण्याची शपथ घेतलेल्या रामदास कदमांनी 'हा' मोठा नेता फोडला...

Kokon Shivsena Politics : काही दिवसांपूर्वीच दापोलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रामदास कदमांनी टीकेची तोफ डागली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही, अशी शपथतच घेतली होती

Deepak Kulkarni

Ratnagiri News : विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना धक्क्यावर धक्के बसत आहे. कोकणात तर ठाकरेंची अनेक नेते, पदाधिकार्‍यांनी साथ सोडली आहे.राजन साळवींसारख्या मोठ्या नेत्यांनं ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे पक्षाची वाट धरली. यानंतर आता दापोली मतदारसंघातही मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंना राजकारणातून उद्धवस्त करण्याची भाषा केलेल्या शिवसेनेच्या रामदास कदमांनी (Ramdas Kadam) आता ठाकरेंना पहिला धक्का कोकणातच दिला आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार व शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे नेते संजय कदम हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.याचबरोबर कोकणातील दोन नेत्यांमधील कट्टर राजकीय शत्रुत्वही संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

मुंबईत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. यात बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांसोबत स्नेहभोजन केलं. यानंतर संजय कदम यांची आपली पुढील राजकीय वाटचालीची दिशा बदलण्याचा निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे फायरब्रँड नेते रामदास कदम आणि माजी आमदार हे दोघंही कट्टर राजकीय विरोधक राहिले आहे.या दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही.तसेच एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाही. पण विधानसभा निवडणुकीत संजय कदमांचा रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी दारुण पराभव केला होता.यानंतर आता संजय कदम यांनी एक पाऊल माघारीचं टाकलं आहे.

संजय कदम आणि रामदास कदम यांच्यात पालखी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांचा मुंबईत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.दरम्यान,आता राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं चर्चा कोकणच्या भूमीत रंगली आहे.

एकापाठोपाठ एक गडाला सुरुंग लागण्यात येत असल्यानं कोकणात ठाकरेंची ताकद कमी होत असून दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाची ताकद वाढत आहे.ठाकरेंकडे भास्कर जाधव सोडून दुसरा असा कसलेला मुरब्बी असा करारी चेहरा नाही. आश्चर्याची बाब म्हणजे संजय कदम आणि रामदास कदम यांनी एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीकेची झोड उठवली होती.

काही दिवसांपूर्वीच दापोलीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर रामदास कदमांनी टीकेची तोफ डागली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर माझं नाव सांगणार नाही, अशी शपथतच घेतली होती. आपल्या मुलाला राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा होता. पण आता आपणच त्यांना उद्ध्वस्त करु असं कदम म्हणाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT