Babanrao Lonikar News : विधानसभा लढवणार नाही म्हणत निवृत्तीचा इशारा अन् लोणीकर झाले तालिका अध्यक्ष!

MLA Lonikaran announces his retirement warning, and the party appoints him as Sabhapati. : विधानसभेचे कामकाज अध्यक्ष व उपाध्यक्ष, तर विधान परिषदेचे कामकाज सभापती व उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली चालते. त्यांना साह्य व्हावे म्हणून दर अधिवेशन कालावधीत त्या-त्या अधिवेशन कालावधीकरिता सदस्यांमधून तालिका सभापतींची निवड केली जाते.
MLA Babanrao Lonikar News
MLA Babanrao Lonikar NewsSarkarnama
Published on
Updated on

Budget Session 2025 : विधानसभेच्या परतूर मतदारसंघातून आठ वेळा निवडणूक लढवून पाच वेळा जिंकलेले भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांचा नुकताच वाढदिवस झाला. या शुभदिनीच त्यांनी यापुढची विधानसभा निवडणूक आपण लढवणार नाही, असे जाहीर करत सर्वांना धक्का दिला. भाजपाचे उपाध्यक्ष, जालन्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री राहिलेल्या लोणीकर यांच्या या घोषणेने त्यांच्या समर्थकांचे चेहरे पडले.

पण त्यांच्या निवृत्तीच्या इशाऱ्यानंतर भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी जबाबदारी दिली. विधानसभेच्या तालिका अध्यक्ष पदाचा मान लोणीकर यांना देण्यात आला. आज तालिका अध्यक्ष म्हणून त्यांनी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या सदस्यांना संधी देत समन्वय साधला. लोणीकर यांना तालिका अध्यक्षपदावर पाहून त्यांच्या समर्थकांना निश्चितच आनंद झाला असेल.

वर्षभरात विधिमंडळाची तीन अधिवेशने होतात. विधानसभेचे कामकाज अध्यक्ष व उपाध्यक्ष, तर विधान परिषदेचे कामकाज सभापती व उपसभापती यांच्या अध्यक्षतेखाली चालत असते. (BJP) त्यांना साह्य व्हावे म्हणून दर अधिवेशन कालावधीत दोन्ही सभागृहांसाठी त्या-त्या अधिवेशन कालावधीकरिता सदस्यांमधून तालिका सभापतींची निवड केली जाते. अर्थात ती करताना या सदस्याचा राजकीय अनुभव लक्षात घेतला जातो. कुठल्याही सदस्यासाठी तालिका अध्यक्ष किंवा सभपाती होणे हा बहुमानच समजला जातो.

MLA Babanrao Lonikar News
MLA Babanrao Lonikar News : राजकारणातून निवृत्ती की प्रमोशन हवयं ? बबनराव लोणीकरांच्या गुगलीने समर्थकांची दांडी गुल!

विधानसभा निवडणूक लढवणार नाही, पण पक्षाने संधी दिली तर एकदा लोकसभा लढवायची आहे, असे लोणीकर म्हणाले होते. आता तालिका अध्यक्ष म्हणून या मानाच्या खुर्चीवर बसल्यानंतर लोणीकरांचे मतपरिवर्तन होते का? की ते आपल्या निर्णयावर ठाम राहतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघातून 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने आमदार बबनराव लोणीकर यांना सलग आठव्यादा उमेदवारी दिली होती.

MLA Babanrao Lonikar News
BJP Minister Harassment Woman : वादग्रस्त प्रकरणामुळे फडणवीसांचे आणखी एक मंत्री अडचणीत

1990 पासूनच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आतापर्यंत तेच भाजपचे उमेदवार राहिले आहेत. पाच वेळा ते निवडून आलेले आहेत. 1999, 2004, 2014, 2019 आणि पुन्हा 2024 मध्ये लोणीकर परतूनमधून निवडून आले. राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. शिवाय जालना जिल्ह्यातील सर्व पाचही विधानसभेच्या जागा महायुतीने जिंकल्या. त्यामुळे जालन्याला मंत्रीपद मिळेल आणि ते आपल्याला मिळेल अशी लोणीकरांची अपेक्षा होती. परंतु हा जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला.

MLA Babanrao Lonikar News
Jalna Political News : जालन्यात भाऊ, दादा की सेठ ? स्थानिक स्वराज्य संस्थेतील वर्चस्वासाठी कुरघोडीचे राजकारण!

त्यामुळे काहीसे नाराज असलेले बबनराव लोणीकर आगामी काळात कोणतीही विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे बोलून गेले. वाढदिवसानिमित आयोजित कार्यक्रमातच त्यांनी हा कठोर निर्णय घेतला. माझे वय आता 60 वर्षे झालेलं आहे, त्यामुळे मी आता रिटायरमेंटच्या दिशेनं आहे. त्यामुळे यापुढे विधानसभा लढायची नाही. पण पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे लोणीकर म्हणाले होते. तालिका अध्यक्ष म्हणून संधी मिळालेल्या लोणीकरांची लोकसभा लढवण्याची बर्थडे विश पूर्ण होणार का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com