Ratnagiri Guhagar Politics News :
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीच्या सभेत शिवसेनेचे (शिंदे गट ) माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांच्यासह उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
भास्कर जाधव सारखा नमक हराम माणूस अख्ख्या जगात कुठे मिळणार नाही. ज्या थाळीत खाणार तिथेच छेद करणार... हा कुणाचाच होऊ शकत नाही... बाकी मी पुढे काही बोलत नाही. जे काही बोलायचं आहे ते नारायण राणे यांचा मुलगा नीलेश राणे बोलला आहे, पण एक सांगतो आता कोणत्याही परिस्थितीत काहीही झालं तरी यावेळेला गुहागर विधानसभा मतदारसंघावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय हा रामदास कदम स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत भास्कर जाधव यांना Ramdas Kadam यांनी सुनावलं आहे.
या नाच्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना सांगून मी तिकीट द्यायला लावलं. घाणेकुंटच्या शाखेत माझ्यासमोर हा आडवा पडला आणि मला लोटांगण घातले. असा भास्कर जाधव सारखा नमक हराम माणूस अख्ख्या जगात दुसरा सापडणार नाही, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला.
हौशे...नौशे..गौशे... नौटंकी करणारे...गोमू... अशा शब्दांत कदम यांनी जाधव यांचा उल्लेख केला. मी बघतो ना तुम्ही चिंता करू नका. येत्या विधानसभा निवडणुकीत मी प्रत्येक कंपनीच्या नावानं कुठे-कुठे कोणी-कोणी किती कॉन्ट्रॅक्ट घेतली आहेत, याचे मी बोर्डच लावणार आहे. लोकांना कळू दे हा लोकप्रतिनिधी आहे की कॉन्ट्रॅक्टर आहे, असा इशारा कदम यांनी जाधव यांना दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी प्रत्येक ज्या-ज्या कंपनीतून कॉन्ट्रॅक्ट घेतले आहेत, त्या कंपनीच्या बाहेर मी बोर्ड लावणार आहे. लोकांना एकदा कळू दे ना. भास्कर वाळू खातो काय? भंगार पण खातो आणि काय काय खातो ते मला माहिती आहे. वेळ येईल तेव्हा बोलेन, असा इशारा रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांना दिला आहे. या गद्दारांनी फक्त भाषणबाजी, नक्कलबाजी याच्या पलीकडे काहीच केलं नाही. गुहागर मतदारसंघाचा विकास झाला नाही. नाचकाम चांगला येतो. तटकरेंना शिव्या घालणार. रामदास कदम यांना शिव्या घालणार. नारायण राणे यांनाही शिव्या घालणार. उदय सावंत यांनाही शिव्या घालणार. हे सगळे नालायक आणि हा तेवढा लायक. असा हा नाचणारा ही गोमू, असे म्हणत कदम यांनी जाधव यांची खिल्ली उडवली आहे.
भाजपचे आशिष शेलार यांनी सभागृहात चांगले सुनावले आहे. इथे काही गोमूचा नाच नाही, हे विधानसभा सभागृह आहे, असे शेलार यांनी भास्कर जाधव यांना सुनावले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नंतर शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून इकडे आला हा गद्दार. आता विकासकामे मी मंजूर करून आणतो आहे. आणि हा खोटी पत्रं पाठवतो, कॉन्ट्रॅक्टरना पाठवतोय. या एका नालायकामुळे कोकणात कायमच शिमगा होतोय. आता याला उभा करू नका, असे म्हणत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर तोफ डागली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.