Ratnagiri News : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या दाव्यावरून शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना, भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवरती भाजपने दावा केला आहे. अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
या सगळ्या विषयावरून महायुतीमध्ये फूट पडेल का, असं विचारले असता रामदास कदम म्हणाले की, अजिबात फूट पडणार नाही. प्रत्येकाला वाटत असतं की आपला पक्ष मोठा झाला पाहिजे. पण, माझं ते माझं आणि तुझं ते पण माझंच असं कधी होत नसतं, अशा शब्दांत रामदास कदम यांनी भाजपला सुनावले आहे.
रामदास कदम म्हणाले, 'तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, रत्नागिरीमध्ये पण आम्हीच असं होत नाही. तुम्हाला सगळ्या पक्षाला संपवून तुम्हाला एकट्यालाच निवडून यायचं आहे का भाजपला, असं त्यातून निष्कर्ष निघेल.
या वेळी त्यांनी ठाकरे गटाचे रायगड लोकसभेचे उमेदवार माजी खासदार अनंत गीते (Anant Geete) यांच्यावरही टीका करत त्यांना केवळ निवडणूका आल्या की कुणबी समाज म्हणत भावनात्मक ब्लॅकमेल करतात, असा आरोप कदम यांनी केला आहे.
रत्नागिरीची जागा ही शिवसेनेची आहे. भाजपच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले, याचं असं होईल आपण दोघे भाऊ, भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्या याला हात नको लावू. पण, असं होतं नाही.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरीचीदेखील जागा सोडणार नाही. ती आम्ही लढवणारच, आमच्या हक्काची आहे. आता जे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आहेत. मागच्या वेळेला त्यांच्या प्रचार करता सावंतवाडी शेवटची प्रचार सभा मी घेतली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आमची हक्काची आहे. ती आम्ही का सोडू, असा खडा सवाल रामदास कदम यांनी केला आहे. ज्या श्रीवर्धन मतदारसंघात 70 टक्के कुणबी समाज आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात मागच्या वेळेला सुनील तटकरे यांना लीड मिळाले, याच आत्मपरीक्षण गीते यांनी कधी केला आहे का ? कुणबी समाजासाठी या माणसाने काहीही केले नाही गीते सहा वेळेला खासदार झाले दोन चार वेळेला मंत्री झाले पण, कोणताही विकास केला नाही, अशा शब्दांत रामदास कदम यांनी सुनावले आहे.
Edited By : Umesh Bambare
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.