कोकण

कुडाळमध्ये तुफान राडा; राणे-नाईकांचे कार्यकर्ते भिडले

आज कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : नगरपंचायत निवडणुकांपासून राजकीय वर्तुळात कोकणातील राजकीय संघर्ष वाढतच चालला आहे. आज कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपसाठी (BJP) ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. कुडाळमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी कुडाळमध्ये पुन्हा शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. (Rane-Naik's activists clash in Kudal)

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना गाडीने कुडाळ नगर पंचायतीच्या इमारतीच्या हद्दीत आणण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नगर पंचायतीच्या इमारतीच्या हद्दीतच वाद झाला. भाजपा विरुद्ध शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की सुरु झाली. नगरपंचायतीमध्ये प्रवेश करणाऱ्या महिला सदस्यांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याच पहायला मिळालं. ज्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत या महिलांना सुरक्षितपणे इमातीत पोहचवले. तसेच, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर लोटत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

दरम्यान, कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठीही प्रतिष्ठेची मानली जात आहे. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत पहिल्यापासून मिळत होते. आता यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सर्व कुडाळकरांच लक्ष लागलं आहे. कुडाळमध्ये भाजप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर शिवसेना आणि काँग्रेस राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न राबवून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी नारायण राणेंची सरशी होणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र फक्त एका जागेच्या फरकाने शिवसेना-काँग्रेसच्या ही नगरपंचायतीवर विजय मिळवला. तर भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. कुडाळ नगरपंचायतीत शिवसेनेला सात आणि काँग्रेसने दोन जागांवर विजय मिळवला. तर आज होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूकीतही भाजप आणि काँग्रेस-शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT