फडणवीसांच्या बंगल्याबाहेर कॉग्रेसचे आंदोलन ; भाजप कार्यकर्ते ताब्यात

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील सागर बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.
फडणवीसांच्या बंगल्याबाहेर कॉग्रेसचे आंदोलन ; भाजप कार्यकर्ते ताब्यात
Published on
Updated on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या महाराष्ट्राबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याची इशारा कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी दिला आहे. त्यावरुन भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी पटोलेंचा एकेरी भाषेत उल्लेख करत बंगल्यासमोर येवूनच दाखव, तुमच्या आंदोलनाला जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर कॉग्रेस आणि भाजपमध्ये वाद चिघळण्याचा शक्यता आहे. फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्याबाहेर कॉग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते जमले आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.कॉग्रेसचे नेते अतुल लोंढेसह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी,'' अशी मागणी करत काँग्रेसनं आंदोलन करण्याची तयारी केली आहे. मलबार हिल येथील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. काँग्रेसचे आंदोलक फडणवीस यांच्या घराच्या परिसरात पोहोचू नयेत याची काळजी पोलिसांनी घेत नेपेन्सी रोड येथे काँग्रेस आंदोलकांना अडवत याच ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली.

फडणवीसांच्या बंगल्याबाहेर कॉग्रेसचे आंदोलन ; भाजप कार्यकर्ते ताब्यात
प्रभाग बदलाच्या पालिका आयुक्तांच्या अध्यादेशाविरोधात जनहित याचिका दाखल

काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देता मग आम्हाला का नाही? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसांना केल्यानंतर पोलिसांनी भाजपला ही शांततेत आंदोलन करा, अशी परवानगी दिल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते हे आंदोलन करतांना समोरासमोर येऊ नयेत, याची काळजी पोलिसांनी घेत ही परवानगी दिली. काँग्रेसचे आंदोलन नेपेन्सी रोडला रोखण्याची तयारी पोलिसांनी केली तर त्याच्याविरुद्ध दिशेला असलेल्या रस्त्याच्या एक किमी अंतरावर भाजप कार्यकर्त्यांना जमण्याची परवानगी देण्यात आली. ''शांततेत आंदोलन करा," असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नाना पटोले यांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com