रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (12 जानेवारी) होणार आहे.
भाजपच्या बैठकीत नगरसेवक समीर तिवरेकर यांच्या नावावर एकमताने सहमती देण्यात आली आहे.
सोमवारी निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Ratnagiri News : रत्नागिरी पालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर पालिकेच्या लोकनियुक्त कारभाराला सुरुवात झाली आहे. येथे ठरलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या धोरणाप्रमाणे नगराध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेले असून उपनगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले आहे. याची निवडणूक सोमवारी (ता. १२) होणार असून उपनगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळत होती. दरम्यान आता नगरसेवक समीर तिवरेकर यांची उपनगराध्यक्षपदासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने निवड केली आहे. तर भाजपची नुकतीच बैठक झाली असून याबाबत औपचारिकता पूर्ण झाली असून फक्त घोषणा होणे बाकी आहे. तीही सोमवारी केली जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रतिष्ठेच्या या नगर पालिकेवर पालकमंत्री उदय सामंत यांना महायुतीची सत्ता मिळविण्यात यश आले आहे. तर या पालिकेवर सत्ता मिळवताना उदय सामंत यांनी भाजपशी हात मिळवणी करत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करत युती करण्यात यश मिळवले होते. यानंतर येथे ठाकरेंच्या शिवसेनेनं दंड थोपाटल्याने ही निवडणुक सामंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली होती. ज्यात त्यांनी मैदान मारले.
या विजयानंतर शिवसेनेला नगराध्यक्षपद गेले असून उपनगराध्यक्षपद भाजपला सोडण्यात आले आहे. या धोरणानुसार आता भाजपने उपनगराध्यक्षपदासाठी नाव निश्चित केल्याचे समोर आले आहे. पण भाजप राजू तोडणकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे यांची नावे चर्चेत होती.
जिल्हा समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.९) महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला शहराध्यक्ष दादा ढेकणे, रत्नागिरी शहर समन्वयक सचिन वहाळकर व भाजपा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये भाजपचे उपनगराध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात आले.
चर्चेत असणाऱ्या नावातील राजू तोडणकर यांची गटनेते म्हणून निवड निवड करण्यात आली आहे. त्यामुळे समिर तिवरेकर यांच्या नावावर उपनगराध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
तिवरेकर उच्चशिक्षित आणि अभ्यासू असून नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या नावावर पक्षाने सहमती दर्शवल्याचे कळत आहे. दरम्यान सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बाळू साळवी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून गटनेता म्हणून केतन शेटये यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
1. रत्नागिरी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक कधी आहे?
सोमवारी, 12 जानेवारी रोजी.
2. भाजपकडून कोणाच्या नावावर सहमती झाली आहे?
नगरसेवक समीर तिवरेकर.
3. ही सहमती कशी झाली?
भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने.
4. निवडणुकीची औपचारिकता कधी पूर्ण होणार?
सोमवारीच निवडणूक प्रक्रियेदरम्यान.
5. ही निवडणूक कुठल्या संस्थेसाठी आहे?
रत्नागिरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.