Ratnagiri Municipal Politics , Ravindra Chavan And Uday samant sarkarnama
कोकण

Sena–BJP Alliance : रत्नागिरीतील भाजप विरुद्ध शिवसेना वाद निकाली : रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीने निघाला तोडगा

Ravindra Chavan On Ratnagiri Municipal Politics : जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर रत्नागिरी नगर पालिकेसाठी शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष वाढू लागला आहे.

Aslam Shanedivan

  1. रत्नागिरी नगरपालिकेत शिंदे सेना–भाजप युती तुटल्यानंतर निर्माण झालेला संघर्ष अखेर शांत झाला आहे.

  2. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पॉवर-शेअरिंग फॉर्म्युला निश्चित करून युतीचे चित्र स्पष्ट केले.

  3. या निर्णयामुळे रत्नागिरीतील राजकीय अनिश्चितता दूर झाली असून निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्ष एकत्र काम करणार आहेत.

Ratnagiri News : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून दुसरीकडे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसनंतर शिंदेंची शिवसेना आक्रमक आणि नाराज झाली आहे. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच फोडाफोडी आणि पळवाळवीच्या राजकारणाने त्रस्त होवून दिल्ली दरबारी गेले. तोच उदय सामंत यांनी मुंबईत गाठत भाजप नेते माजी आमदार विनय नातू यांची भेट घेतली होती. तसेच जिल्ह्यातील युतीबाबत चर्चा केली होती. ज्यानंतर येथील आगामी रत्नागिरी नगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारा शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता थांबला आहे. येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असून भाजप विरुद्ध शिवसेना वादही निकाली निघाला आहे.

जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच स्वबळाचा नारा दिल्यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी भाजपसह राष्ट्रवादीविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढवायची असल्याचे सांगितले होते.

पण जागा वाटपांसह नगराध्यक्ष पदाचा निढा न सुटल्याने भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेने शेवटच्या दिवशी आपले उमेदवार मैदानात उतरवले. यामुळे लांजा, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड पाठोपाठ रत्नागिरी नगर पालिकेच्या मैदानातही शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष दिसून आला. येथे भाजपच्या पदाधिकारी श्रुती ताम्हणकर यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी देण्यात आली असून त्या शिंदे सेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. तर

आमदार कीरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा करत त्यांचे अर्जही दाखल केले. यावरून भाजपने नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान भाजपनेही 6 जागांवर आपले उमेदवार उतरवत अर्ज दाखल केले. यामुळे रत्नागिरी नगर पाकिलेसाठी उमेदवारांची घोषणा होताच येथील वातावरण आता ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं जास्त जागा घेतल्याने मित्र पक्ष असणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाल्याने चित्र येथे आहे.

पण आता येथे महायुतीचा फॉर्म्युला असून याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच केली आहे. त्यांनी, रत्नागिरीत सत्तेचा फॉर्म्युला ठरत जिथे भाजपचा नगराध्यक्ष तिथे शिवसेनेचा उपनराध्यक्ष आणि काही समित्या दिल्या जातील. तर जिथे शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे, तिथे भाजपला उपनगराध्यक्ष आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये समान वाटा दिला जाईल, अशी घोषणा केली आहे.

त्यांच्या या घोषणेमुळे आता रत्नागिरीतील युतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच उदय सामंत यांनी देखील आदेश देताच जे माघारी घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करू असे संकेत दिले आहेत. यामुळे किमान आता तरी येथील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत वाद थांबणार आहे.

FAQs :

1. रत्नागिरीत शिंदे सेना–भाजपमध्ये संघर्ष का झाला होता?

नगरपालिकेतील सत्तावाटप, पदवाटप आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेदांमुळे संघर्ष उद्भवला होता.

2. युतीचा नवा फॉर्म्युला कोणाने ठरवला?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा फॉर्म्युला अंतिम केला.

3. फॉर्म्युल्यात काय ठरले?

नगराध्यक्ष–उपनगराध्यक्ष आणि समित्यांच्या पदांचे समान आणि स्पष्ट वाटप करण्यात आले आहे.

4. युती तुटल्यानंतरही पुन्हा एकत्र येण्याचे कारण काय?

निवडणुकीपूर्वी महायुती मजबूत करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

5. रत्नागिरीतील पुढील राजकीय चित्र कसे दिसते?

फॉर्म्युला ठरल्यानंतर युती स्थिर झाली असून दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT