Ravindra Chavan Decision : पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा भाजप प्रवेश; टीका होताच प्रदेशाध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

Palghar Sadhu Lynching Accused Kashinath Chaudhary BJP Entry Stayed by State President Ravindra Chavan : नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पालघर भाजपमध्ये साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरी याने भाजपमध्ये प्रवेश केला.
Ravindra Chavan Decision
Ravindra Chavan DecisionSarkarnama
Published on
Updated on

Palghar Sadhu Lynching Case : पालघरच्या गडचिंचले इथं साधुंच्या हत्याकांडामधील आरोपी काशिनाथ चौधरी याच्या भाजप प्रवेशाची दखल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेत, त्या निर्णयाला स्थगिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशिनाथ चौधरी याने भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पण भाजपच्या या निर्णयावर राज्यभरात चौफेर टीका सुरू झाली. समाज माध्यमांमध्ये तसे वृत्त व्हायरल झाली. एकप्रकारे भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या पक्षप्रवेशाची गंभीर दखल घेत, काही वेळातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. तसा आदेशच काढला. रवींद्र चव्हाण यांच्या आदेशामुळे भाजपमधील राज्य ते लोकल पातळीवर असलेला समन्वय, शिस्तीप्रियता, निष्ठेच्या वल्गनांवर तिरकस चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे (BJP) रवींद्र चव्हाण यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, "पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश दिलेल्या काशिनाथ चौधरी यांच्याबाबत पालघर साधू हत्याकांडाशी संबंधीत चर्चा पुन्हा प्रसिद्धी माध्यम व सामाजिक माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करुन तथ्यांवर आधारित त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन, काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे."

महाविकास आघाडी सरकारचा (MVA) काळात, 16 एप्रिल 2022 च्या रात्री दोन साधू सुरतकडे निघाले होते. साधुंचे वाहन पालघरच्या गडचिंचले इथं थांबवून जमावाने त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेवर भाजपने महाविकास आघाडीने तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आरोपांची राळ उडली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडावेळी साधू हत्याचे देखील कारण दिले. याच साधू हत्येतील प्रमुख आरोपी काशिनाथ चौधरी याला भाजप पक्षात प्रवेश मिळाल्याने चौफेस टीका होऊ लागली होती.

Ravindra Chavan Decision
Devendra Fadnavis Narco Test : देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा; काँग्रेस नेत्याच्या मागणीनं खळबळ

काशिनाथ चौधरी याने रविवारी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या या प्रवेशानंतर भाजपने केलेल्या आरोपांचे काय झाले? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विचारीत आहेत. काशिनाथ चौधरी याने जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

Ravindra Chavan Decision
Devendra Fadnavis cousin Alhad Kaloti : मुख्यमंत्री फडणवीसांचे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू इथं काशिनाथ चौधरी याने कमळ हाती घेतले. काशिनाथ चौधरी याच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. राज्यासह देशात पालघरमधील साधू हत्याकांडाची बरीच चर्चा झाली. भाजपने या हत्याकांडावरून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणले होते. पोलिसांनी या प्रकरणी 200 जणांना अटक केली होती. तसंच या प्रकरणात 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

अशा संवेदनशील प्रकरणात पालघर भाजप पदाधिकाऱ्यांनी आरोपी काशिनाथ चौधरी याला पक्षप्रवेश दिल्याने चौफेर टीका सुरू झाली होती. या मुद्यावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजपमध्ये सोशल मीडिया वाॅर रंगला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्यात एक्सवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. यातच रवींद्र चव्हाण यांनी काशिनाथ चौधरी याच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याने, विरोधकांवर या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची पंचाईत झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com