Nilesh Rane - Bharat Gogawale  Sarkarnama
कोकण

Nilesh Rane On Bharat Gogawale : वरिष्ठ नेते असतानाही तुम्ही मंत्री नाही, राणेंनी गोगावलेंना डिवचले !

Chaitanya Machale

Bharat Gogawale News : भाजपचे नेते नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मताधिक्यावरून शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यातील वादप्रतिवाद थांबण्याची चिन्हे नाहीत. यापूर्वी भाजप नेते निलेश राणे यांनी निवडणुकीत किरण सामंत यांनी राणेसाहेबांसाठी काम केलं नाही. तसेच ते उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंना भेटले होते, असा आरोप केला होता.

निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे पक्षनेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर देत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मिळालेले मताधिक्य त्यांचे आहे का ? राणे यांच्या विजयात आमचा वाटा आहे. त्यांना जी 77 हजार मते मिळाली ती काय त्यांची मते आहेत का ? असे प्रश्न उपस्थित करत भरत गोगावले यांनी निलेश राणे यांना उत्तर दिले होते. गोगावले म्हणाले, निवडणुकीच्या काळात भाजपच्या देखील अनेक ठिकाणी उलट्यापालट्या घडामोडी झालेल्या आहेत. मग त्या आम्ही सांगायच्या का, आम्ही सगळीकडे दावे करायचे का?

आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. मग आम्हाला त्यावर देखील विचार करावा लागेल. त्यांनी इतरत्र काही न बोलता त्यांना सांगतो, त्यांनी बोलताना संभाळून बोलावे. गोगावले यांनी दिलेल्या उत्तरावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही आता उत्तर दिले आहे. ते म्हणाले, गोगावले हे एक सिनीअर आमदार आहेत.

यापूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेत मी कधीही टोकाची भूमिका घेतली नव्हती. तुम्ही सिनीअर आमदार आहात. आज खरं तुम्ही मंत्री हवे होता. पण तुम्ही नाही आहात.तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असे म्हणत राणे यांनी भरत गोगावले यांना डिवचले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीच्या नेत्यांकडून एकमेकांवर केल्या जाणारे आरोप-प्रत्यारोप थांबणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT