Nilesh Rane On Rohit Pawar: ठाकरे गटाला जॅकपॉट तर रोहित पवार फार लहान; राणेंचा प्रहार

Nilesh Rane On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं.
Nilesh Rane, Rohit Pawar
Nilesh Rane, Rohit Pawar Sarkarnama

Nilesh Rane On Rohit Pawar, Aditya Thackeray: रोहित पवार काय म्हणतात त्याला मी फारसं महत्त्व देत नाही. ते फार लहान आहेत. शरद पवारसाहेबांचं एकवेळ मी समजू शकतो त्यांची उंची त्यांचं राजकीय वय सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांना डिवचलं आहे. 'अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत.' असं वक्तव्य रोहित यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार राणे यांनी घेतला.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून राजकीय नेते विरोधकांवर वेगवेगळे आरोप करत काही धक्कादायक दावे करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसमधील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं.

रोहित पवारांच्या या दाव्यावर बोलताना निलेश राणे यांनी टीकास्त्र डागलं. राणे म्हणाले, "रोहित पवार काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही. अजून ते फार लहान आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये शरद पवारसाहेबांचे मी समजू शकतो. त्यांची उंची त्यांचं राजकीय वय या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण रोहित पवार काय म्हणतात त्यांचा अभ्यास किती? यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही कारण ते एवढे नवीन आहेत त्यांच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची."

Nilesh Rane, Rohit Pawar
NDA Meeting Modi 3.0 : एकनाथ शिंदे अन् अजितदादांनी संसद भवनात पहिल्यांदाच ठोकलं भाषण; नेमकं काय म्हणाले?

तसंच यावेळी त्यांनी अरविंद सावंत आणि आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. अरविंद सावंत हे निवडून आले हा त्यांच्यासाठी जॅकपॉट आहे. तर आदित्य ठाकरे हे स्वतःच्या कर्तुत्वावर निवडून आलेले नाहीत. त्यांचं स्वतःचं कर्तुत्व शून्य आहे. दोन आमदार रेडिमेड तयार झाले. पक्षाने तयार केले. वडील मुख्यमंत्री होते म्हणून ते निवडून आले. मात्र, आता ते आपटणार. आगामी निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे काय परत आमदार होअशा शब्दात राणे यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com