Loksabha Election : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून किरण सामंत हे लढण्यावर ठाम आहेत. या जागेसाठी त्यांनी काल (रविवारी) नागपूरला जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उमेदवारीचा कुठलाही शब्द देवेंद्र फडणवीस यांनी किरण सामंत यांना दिला नसल्याची माहिती आहे. शिवसेनेकडून नाही तर आपण भाजपकडूनदेखील लढण्यास तयार असल्याचे किरण सामंत यांनी सांगितल्याचे बोलले जात आहे. सामंत यांना काही काळ शांत राहण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा निर्णय दिल्लीतून होईल, असेदेखील फडणवीस यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भेटीनंतरही किरण सामंत (यांनी आज उमेदवारी अर्ज घेतले. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडूनदेखील उमेवारी अर्ज घेण्यात आले आहेत. त्यामुळे या जागेवरील तिढा अजूनही सुटला नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या जागेबाबतचा निर्णय दिल्लीत होणार आहे.
किरण सामंत यांच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही अर्ज घेतला आहे. महायुतीचा उमेदवार असेल त्याचा प्रचार करण्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या आहेत. मात्र, हा मतदारसंघ खूप मोठा आहे त्यामुळे किरण सामंत यांना उमेवारी जाहीर झाली, तर तयारीत असावे म्हणून आम्ही अर्ज घेतले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारीतून माघार घेत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. मात्र, नंतर ती पोस्ट त्या डिलीट केली. त्यांचे बंधू मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, या जागेसाठी शिंदे गट आग्रही आहे. मात्र, आपल्यामुळे एकनाथ शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. मात्र, याविषयी आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी ती डिलीट केली. दरम्यान, महायुतीत राज्यस्तरावर ज्या जागांच्या संदर्भात निर्णय होत नाहीत. त्या जागा संदर्भात अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात तेच अंतिम निर्णय घेतील.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.