Narayan Rane News : राणे अर्ज भरण्यासाठी उतावीळ, शिंदे गट मात्र नाराज, बैठकाही झाल्या रद्द !

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संभाव्य उमेदवार नारायण राणे हे आज वेंगुर्ल्यात जिल्हा परिषदनिहाय बैठका घेणार होते...
Ratnagiri Sindhudurg LokSabha Election 2024
Ratnagiri Sindhudurg LokSabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri Sindhudurg News : लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असली तर अद्यापही महायुतीत सहभागी असलेल्या पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. राज्यातील नऊ जागांवर अद्यापही महायुतीत सहभागी असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पक्षातील नेत्यांचे एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जागेचा समावेश आहे. ही जागा लढविण्याची तयारी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यास शिंदे गटाने विरोध केला आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गची (Sindhudurg) जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोडू नये, असा आग्रह शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला आहे. या जागेवरून नारायण राणे हे निवडणूक लढविण्यासाठी ठाम आहेl. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या जागेवरून शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे इच्छुक आहेत. सामंत यांचे बंधू उदय सामंत यांनी देखील या मतदारसंघावर आपला दावा वारंवार सांगितला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ratnagiri Sindhudurg LokSabha Election 2024
Thane Loksabha Constituancy : चोरलेली शिवसेना असूनही फोडलेली राष्ट्रवादी का लागते...केदार दिघे यांचा मोदींना सवाल

दोन दिवसांपूर्वी उदय सामंत (uday samant) यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामध्येदेखील या मतदारसंघाबाबत चर्चा झाली. मात्र त्यामध्ये निर्णय होऊ शकला नाही. या मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण सामंत यांनादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावून घेतले होते. या जागेसाठी राणे हे आग्रही असून, त्यांनी यासाठी जोरदार ताकद लावली आहे. शिंदे गट तसेच भाजप हे दोघे यासाठी आग्रही असल्याने अद्यापही या जागेचा तिढा सुटू शकलेला नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजप केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संभाव्य उमेदवार नारायण राणे हे आज वेंगुर्ल्यात जिल्हा परिषदनिहाय बैठका घेणार होते. मात्र, अचानक या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी याचे स्टेटस ठेवत, 'कुणाच्या तरी हट्टामुळे दोन वेळा नियोजित सभा रद्द झाल्या', असा टोला अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (deepak kesarkar) यांना लगावला आहे. या सर्व घडामोडींमुळे या मतदार संघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चांगलेच बिनसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Ratnagiri Sindhudurg LokSabha Election 2024
Supriya Sule Vs Ajit Pawar : 'काय चुकलं तिचं? भाऊ फितूर झाला; स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला'

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्याने या मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) हे कोणत्याही क्षणी उमेदवारी अर्ज भरू शकतात. त्यामुळे शिंदे गटाचे पदाधिकारीदेखील सतर्क झाले आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत बैठका न होऊ देण्याचा शिंदे गटातील नेत्यांनी घेतला असल्याची चर्चा आता या मतदारसंघात सुरू झाली आहे. दरम्यान, आता राणे यांनी खरोखरच भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यास शिंदे गट काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

R

Ratnagiri Sindhudurg LokSabha Election 2024
India Politics 2024 : भारतीय राजकारणातील ‘Noob’ कोण? उत्तर देताना मोदींनाही हसू आवरेना

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com