Ratnagiri Bank Election Politics; Uday Samant Sarkarnama
कोकण

Bank Election : उदय सामंतांनी दंड थोपटलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप मतदार यादी तयार, प्रक्रिया सुरू

Ratnagiri District Bank Election Schedule : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून पडदा उठवत पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली होती.

Aslam Shanedivan

RDCC Bank Ratnagiri Latest News : राज्यात विविध जिल्हा बँकांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. अशातच कोकणातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. दरम्यान गेल्याच आठवड्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे.

जिल्हा बँकेवर डॉ. तानाजीराव चोरगे यांचे वर्चस्व असून सर्वपक्षीय पॅनेल आहे. प्रत्येक पक्षाला यामध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र आता बँकेच्या आगामी निवडणुकीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत संचालक पदासाठी रिंगणात उतरणार असल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘सामंत पॅटर्न’ पाहायला मिळेल अशी चर्चा आहे.

जिल्हा बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यानंतरच प्रशासनाकडून ही यादी अंतिम करण्यासाठी आता अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ अ ब आणि सहकार प्राधिकरणाच्या निर्देशानुसार याबाबत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था, कोकण विभाग) यांनी प्रसिद्ध केली आहे.

कुठे आहे उपलब्ध?

प्रसिद्ध केलेल्या जाहीर सूचनेनुसार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय सहनिबंधक कार्यालय, नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, सहायक निबंधक कार्यालये तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांसह अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे नागरिकांना ती पाहता येईल.

हरकत किंवा आक्षेप

दरम्यान आता ज्या सभासदांना या मतदार यादीवर हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल त्यांनी १ ते १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तो नोंदवायचा आहे. ही हरकत किंवा आक्षेप विभागीय सहनिबंधक कार्यालय, नवी मुंबई येथे प्रत्यक्ष, टपालामार्फत किंवा djrkkn@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवता येईल असेही या जाहीर सूचनेत सांगण्यात आले आहे.

अंतिम मतदार यादी

सभासदांनी हरकती किंवा आक्षेप पाटवल्यानंतर त्यांची छाननी केली जाईल. हे काम २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत केले जाणार आहे. यानंतरच २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केले जाणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे या जाहीर सूचनेत आक्षेप घेणाऱ्यांने आपला स्वतःचा ई-मेल आयडी आणि व्हॉट्सअॅप नंबर नमूद करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. छाननी सुनावणीची नोटीस ही स्पीड पोस्ट, ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर पाठवली जाणार आहे.

तसेच विभागीय सहनिबंधक यांनी यावेळी डिजिटल माध्यमातून पाठवलेली नोटीस हे देखील अधिकृत समजून आक्षेप घेणाऱ्यांनी दिलेल्या वेळेत सुनावणीसाठी हजर राहावे असेही आवाहन विभागीय सहनिबंधक यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT