Satara Dcc Bank Election : भाजपनं अखेरच्या क्षणी डाव टाकला; राष्ट्रवादी-शिवसेनेला चर्चेत गाफील ठेवत ‘बी प्लॅन’ केला ॲक्टिव्ह!

BJP Politic's : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा नारा असला तरी भाजपने सर्व मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मित्रपक्षांशी जागावाटपाची चर्चा सुरू ठेवत भाजपने स्वतंत्र तयारी केल्याचे दिसते.
Satara Dcc Bank Election
Satara Dcc Bank Electionsarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 03 October : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा नारा घुमत असला, तरी भारतीय जनता पक्षाने बँकेवर वरचष्मा ठेवण्‍यासाठी आणि ताकदीला मूर्त रूप देण्‍यासाठी रणनीतीनुसार पावले टाकल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांचा विचार करता मित्रपक्ष शिवसेना-राष्ट्रवादीला महायुतीच्या चर्चेत गुंतवून ठेवत सर्वच मतदारसंघात आपले शिलेदार उतरवल्याचे दिसून येते.

शिवसेना-राष्ट्रवादीशी जागा वाटपाची बोलणी सुरू असतानाच सर्वच्या सर्व मतदारसंघांत आपल्या पक्षातील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

सातारा जिल्हा सहकारी बँकेची यंदाची निवडणूक भाजपच्या राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी महायुतीतील मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध किंवा सोपी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, राजकारणातील अनिश्चितता लक्षात घेता भाजपने सर्वच ठिकाणी आपले दावेदार तयार ठेवून ‘प्लॅन-बी’ सजवला आहे.

महायुती म्हणून एकत्र लढताना जागा वाटपाचा योग्य तोडगा निघाला तर ठीक, अन्यथा ऐनवेळी स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने ठेवली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चांच्‍या फेऱ्या होणार आहेत. या चर्चेत तोडगा न निघाल्यास भाजप स्वबळाचा प्रयोग करू शकतो. अशा परिस्थितीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Satara Dcc Bank Election
Karad Politic's : पवारांच्या शिलेदारासह भाजप नेत्यांनी वाढविले ॲड उदयसिंह उंडाळकरांचे टेन्शन; शेवटच्या दिवशीच्या अर्जाने धाकधूक वाढली

भाजपने सर्व मतदारसंघांत अर्ज भरून एकप्रकारे राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर दबावतंत्र वापरल्याची चर्चा आहे. महायुती फुटली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपैकी कोणता पक्ष भाजपच्या बाजूने ठाम उभा राहणार आणि कोण विरोधात जाणार, यावर जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणांची गणिते अवलंबून असतील. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मित्रपक्षांच्या नेत्यांना ताकही फुंकून प्‍यावे लागणार, हे निश्चित.

भाजपचे मतदारसंघनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे

सोसायटी मतदारसंघ :

सातारा- सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सर्जेराव सावंत

जावळी- ज्ञानदेव रांजणे

कोरेगाव- सुनील खत्री

फलटण- समशेरसिंह नाईक-निंबाळकर, शिवरूपराजे निंबाळकर

खंडाळा- नितीन भरगुडे-पाटील, संजीव ऊर्फ अनिरुद्ध गाढवे

माण- ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

खटाव- धनंजय चव्हाण, नंदकुमार मोरे, सुनीता धैर्यशील कदम

कऱ्हाड- जगदीश जगताप, धनंजय पाटील, रामकृष्ण वेताळ

पाटण- सत्यजित पाटणकर, याज्ञसेन पाटणकर

Satara Dcc Bank Election
Solapur Politic's : दक्षिण सोलापूरमधील ‘या’ सोसायटीबाबत सुभाष देशमुखांची मोठी मागणी; थेट निबंधकाला लिहिले पत्र

खरेदी-विक्री संघ : विश्वासराव निंबाळकर

कृषी उत्पादन प्रक्रिया संस्था : डॉ. अतुल भोसले

नागरी बॅंका व पतसंस्था : रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, सुरभी भोसले, अविनाश कदम, याज्ञसेन पाटणकर

गृहनिर्माण व दुग्ध संस्था मतदारसंघ : खासदार उदयनराजे भोसले

औद्योगिक विणकर व मजूर संस्था : चंद्रकांत जाधव, नंदकुमार बर्गे

राखीव :

महिला प्रतिनिधी : सुनेत्रा शिंदे, सुनीता धैर्यशील कदम, विद्या जगदीश जगताप

अनुसूचित जाती जमाती : कामेश कांबळे, सुरेश सावंत, आमदार सचिन पाटील

ओबीसी प्रवर्ग : लक्ष्मण कडव, शंकर माळवदे, वसंतराव मानकुमरे, अशोक मोने, भरत देशमुख, जयवंत कुंभार, धनंजय पाटील

विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग : अर्जुन काळे, शांताराम शेळके, शिवाजी गोरे, तुकाराम शिंदे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com