Ravindra Chavan sarkarnama
कोकण

Ravindra Chavan : निकटवर्तीयाच्या राजीनाम्याने भाजप प्रदेशाध्यक्ष दुखावले; थेट रत्नागिरीत जाऊन हल्लाबोल, कार्यकर्त्यांनाही केलं चार्ज

Ravindra Chavan On Rajesh Sawant : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या सुसाट इनकमिंग सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोकण दौर्‍यातच भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी येथून काढता पाय घेतला होता.

Aslam Shanedivan

  1. रतनागिरीत महायुतीत तणाव निर्माण झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना नातेसंबंधांमध्ये न अडकण्याचा सल्ला दिला.

  2. त्यांनी स्पष्ट केले की राजेश सावंत आता भाजपचा भाग नाहीत, त्यामुळे याबाबत कोणतीही गोंधळाची भूमिका नको.

  3. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन महायुतीचा प्रचार करण्याचे आणि जिल्ह्यात भगवा फडकवण्याचे आवाहन केले.

Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येथे स्थानिक राजकीय नेते आपल्या नात्यांसाठी मैदानात उतरले असून ते पक्षालाच फाट्यावर मारताना दिसत आहेत. भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण कोकण दौर्‍यातच राजीनामा देत राजीनामा दिला होता. ज्यानंतर चव्हाण यांनी पुढील दौरा रद्द करत थेट सिंधुदुर्ग गाठले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळण्यासह त्यांचा हिरमोड झाला होता. पण आता त्यांनी रत्नागिरीत जाऊन राजेश सावंत यांच्यावर हल्लाबोल करत कार्यकर्त्यांनाही चार्ज केलं आहे. त्याचवेळी रत्नागिरीत महायुतीमध्ये नाती आड येताना दिसत आहेत. परंतु नात्यांमध्ये अडकून पडू नका, नाहीतर गडबड होईल. राजेश सावंत हे आता भाजप पक्षाचा कोणताही भाग नाहीत. त्यामुळे आता त्यांचे स्टेटस पाहू नका असा सल्लाही भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरी महायुतीच्या निर्धार मेळावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना संपर्क प्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हा संयोजक अॅड. दीपक पटवर्धन, वैभव खेडेकर, राहुल पंडित, प्रशांत यादव, बिपिन बंदरकर तसेच महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी, रत्नागिरीत महायुतीमध्ये नाती आड येताना दिसत आहेत.

परंतु नात्यांमध्ये अडकून पडू नका, नाहीतर गडबड होईल. राजेश सावंत हे आता भाजप पक्षाचा कोणताही भाग नाहीत, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोणाची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहण्याची गरज नाही. त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना पक्षात किती मोठा सन्मान दिला. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायचे आहे की पक्षातील वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे. महायुतीचे प्रामाणिक काम करून घराघरात पोहचा आणि जिल्ह्यात महायुतीचा भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

तसेच चव्हाण म्हणाले, भाजप आणि शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ‘धनुष्यबाण आणि कमळ’ हे चिन्ह प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत पोहोचवले पाहिजे आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढली पाहिजे. कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी युतीचा उमेदवार विजयी होईल, याची जबाबदारी घ्यावी. महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध ज्या कार्यकर्त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत, त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी मन वळवा. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर महायुतीचा उमेदवार विजयी झाला तर केंद्रातील आणि राज्यातील निधी चांगल्या प्रकारे आणता येईल.

केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर महायुतीचा उमेदवार विजयी झाला तर केंद्रातील आणि राज्यातील निधी चांगल्या प्रकारे आणता येईल, असे चव्हाण यांनी सांगितले. कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले रोजगार धोरण यशस्वी करण्यासाठी दोन्ही स्तरांवर महायुतीचे सरकार प्रयत्न करत आहे. ‘एमआयडीसीकडून अनेक प्रकल्प येत आहेत’ आणि येणाऱ्या काळात या भागांमध्ये दहा-पंधरा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. स्थानिकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी कोकणात निर्माण होणारी ही एक वेगळी संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान आता भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी चव्हाण यांच्या सल्ल्यावरून नाराजी व्यक्त केली असून आता आपण दुप्पट ताकदीने मुलीचा प्रचार करणार करणार असल्याची भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. ते म्हणाले, चव्हाण यांनी आदेश दिला असता तर मी पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला असता. पण आता पक्षाने मला बेदखल केले आहे. त्यामुळे मी आता माझ्या मुलीचा प्रचार करणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये राजेश सावंत यांची मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभी आहे. याच मुद्द्याला धरून साधारणपणे 15 दिवसांपूर्वी सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रत्नागिरी येथे बुधवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राजेश सावंत यांना लक्ष केले. राजेश सावंत यांचं व्हाट्सअप स्टेटस बघू नका ते आता पक्षाचा भाग नाहीत. महायुतीमध्ये नात्यांना महत्त्व नाही असा सल्ला चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला होता. ज्यानंतर राजेश सावंत यांनी आपली भूमीका स्पष्ट केली आहे.

FAQs :

1. रवींद्र चव्हाण यांनी नेमकं काय सांगितलं?

त्यांनी कार्यकर्त्यांना नातेसंबंधांमध्ये अडकू नका आणि महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम करा, असे सांगितले.

2. राजेश सावंत यांच्याबाबत काय स्पष्ट करण्यात आले?

ते आता भाजपचा भाग नाहीत, अशी अधिकृत भूमिका चव्हाण यांनी घेतली.

3. रतनागिरीत काय तणाव निर्माण झाला आहे?

मahayutiतील काही नेत्यांमधील वैयक्तिक नातेसंबंध आणि अंतर्गत मतभेदामुळे तणाव वाढला आहे.

4. कार्यकर्त्यांकडून पक्षाची अपेक्षा काय आहे?

घराघरात जाऊन महायुतीचा संदेश पोहोचवणे आणि ऐक्याने काम करणे.

5. रवींद्र चव्हाणांचा मुख्य संदेश कोणता होता?

वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयांचा आदर करा आणि जिल्ह्यात महायुतीचा झेंडा फडकवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT