Uddhav Thackeray Sarkarnama
कोकण

Shivsena UBT : कोकणात शिंदेंच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीही शिवसेनेच्या मुळावर?, बडा नेता तटकरेंनी फोडला

Sunil Tatkare On Shivsena UBT : सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहताना दिसत आहेत. अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नसली तरीही सर्वच पक्ष आपल्या पक्षांसाठी चांगले नेते हेरून त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत आहेत.

Aslam Shanedivan

Raigad News : कोकणात सध्या ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच उरत नसल्याचे दिसत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षासाठी उमेदवारांचा वानवा भासणार आहे. जे उरले सुरले आहेत ते देखील महायुतीच्या वाटेवर आहेत. नुकताच ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता. त्यांनी भाजपला चकवा देत थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या जखमेची खपली पडते ना पडते आता आणखी एका नेत्याने ठाकरेंची साथ सोडली आहे.

रायगडच्या रोह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना रोहा तालुका प्रमुखानेच शिवसेना सोडण्याचा निर्धार केला आहे. यामुळे तालुक्यात आता शिवसेना वालिच उरला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे समीर शेडगे यांनी शिवसेना अखेरचा रामराम ठोकत आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून दिला आहे.

तर शेडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले असून याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट देखील घेतली. आता येत्या 13 एप्रिल रोजी ते तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

समीर शेडगे हे आधी सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र आठ वर्षापूर्वी रोहा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. तर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर शेडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण आता शेडगे यांची घरवापसी तटकरे यांनी घडवून आणली आहे.

दरम्यान गेल्याच महिन्यात महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी ठाकरेंची साथ सोडली होती. त्यांनी शिवसेना अखेरचा जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता.

तर त्या भाजपच्या वाटेवर असल्याच्या मध्यंतरी जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र भाजपमध्ये न जाता त्यांनी सुनील तटकरे मदतीने अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT