Shivsena UBT : ठाकरे करणार शुन्यापासून सुरुवात; जुन्या घोषणेनं पक्षाला दाखवणार सुगीचे दिवस?

Uddhav Thackeray Shivsena Politics : कोकणासह राज्यभर ठाकरे गटाला खिंडार पडत आहे. पश्चिम महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगरचे हादरे बसले आहेत. अनेक नेत्यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Sangli News : कोकणासह राज्यभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेश टायगर सुरू आहे. तसेच भाजपकडून सदस्य नोंदणी कार्यक्रमातून कार्यकर्त्यापर्यंत पोहचण्याकडे लक्ष दिलं जात आहे. पण विधानसभेवेळी बसलेल्या फटक्यातून अद्याप शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार गट सावरलेला नाही. मात्र आता माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या बांधणीला सुरूवात केली आहे. यासाठी त्यांनी शुन्यापासून सुरुवात करताना मोठी घोषणा केली आहे. तर सांगलीसह राज्यातील शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

यावेळी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुंबई येथे ‘मातोश्री’वर ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी, पक्ष सोडून गेलेल्या व रिक्त झालेल्या जागा ताबडतोब भराव्यात, ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ ही संकल्पना राबवावी.

भाजप आणि मित्रपक्षांकडून सुरू असलेला जुलमी कारभार जनतेसमोर मांडावा, पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवावी आणि पक्षाचे धोरण शिवसैनिकांनी जनतेसमोर न्यावे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : कोकणात दोस्तीत कुस्ती! ठाकरेंनी रत्नागिरीत काँग्रेसचा बडा नेता फोडला

या बैठकीत ठाकरे यांनी, शिवसैनिकांना संबोधताना त्यांच्या कामाचे कौतुक केलं आहे. सध्या शिवसैनिक, खडतर परिस्थितीत निष्ठेने पक्षाचे काम करत असल्याचे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी संघर्षाबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांचे राज्य लवकरच येईल, अशीही भावना व्यक्त केली.

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोडावरून जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील यांच्यासह मिरजेचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. याचवेळी सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करताना शिंदे गटात प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : काँग्रेस नेत्याच्या प्रवेशानंतर ठाकरेंचा इशारा, म्हणाले, 'फक्त कोकणात पाय ठेवा! बघू, कोण मध्ये येतय?

अशावेळी आता ठाकरे गटातील नेत्यांची बैठक थेट माश्रोवर लावत स्वत: उद्धव ठाकरे यांनीच त्यांना धीर देत नवा कानमंत्र दिला आहे. यामुळे सध्या ठाकरे गट जिल्ह्यात पुन्हा सक्रीय होण्यासाठी बुस्टर मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com