Congress Leader join BJP : Sarkarnama
कोकण

Congress Leader join BJP : काँग्रेसला रामराम ठोकत संजय आयरेकरांचा भाजपात प्रवेश

BJP-Congress Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कोकणात आक्रमकपणे पक्ष बांधणी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कोकणात आक्रमकपणे पक्ष बांधणी सुरू केली आहे. स्थानिक पक्षातील स्ट्राँग नेतेमंडळींना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अशातच रत्नागिरीतील भाजपाने लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या गळाला लागला आहे.

लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष रिंगणेचे सरपंच संजय आयरेकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. लांजा तालुक्यात काँग्रेसला हा मोठा धक्काच मानला जात आहे.

शैक्षणिक क्षेत्राचा अभ्यास आणि सहकारी संस्थांचे पदाधिकारी असलेले आयरेकर यांचा लोकसंग्रह मोठा आहे. त्यांना भाजपामध्ये आणण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्या उल्का विश्वासराव यांनी जोरदार प्रयत्न केल्याचे सांगितले जाते.

गुरूवारी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आयरेकर यांच्यासोबत यावेळी शामराव कांबळे,रमेश धुळप, रमेश धुळप, अनिल राजीवले, विलास आयरे,महेश वाडेकर, सुनील पेडणेकर, उत्तम पांचाळ, अनिकेत आयरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपाच्या विचारधारेमुळे आणि विकासासाठी जे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत, त्यांना संपूर्ण ताकद देण्यात येईल, जिथं शक्य तिथं अशा कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. तर आपण लांजा तालुक्याच्या विकासकामासाठी आपण काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करत आहोत. यापुढच्या काळात लांजा तालुक्यात भाजपाची ताकद वाढवू, असा विश्वास आयरेकर यांनी व्यक्त केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT