Sunil Tatkare, Sanjay Raut, Ajit Pawar Sarkarnma
कोकण

Sanjay Raut : सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नसून अमित शाह आहेत ; संजय राऊत यांचा दावा

Sanjay Raut Claims Sunil Tatkare Follows Amit Shah, Not Ajit Pawar : सुनील तटकरे हे अजित पवार यांचे नेते नसून ते अमित शाह यांचे नेते असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवार (ता. १२) एप्रिलला रायगड दौऱ्यावर येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्त अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. त्यावरुन उबाठा खासदार संजय राऊत यांनी तोफ डागत अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीही आशीर्वाद देणार नसल्याचं म्हटलं आहे.

तसेच अमित शाह राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार आहेत. त्यावर बोलताना सुनील तटकरे हे अजित पवार यांचे नेते नसून ते अमित शाह यांचे नेते असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना अमित शहा हे भोजनासाठी तटकरे यांच्या निवासस्थानी जाणार आहेत त्यावर विचारले असता राऊत म्हणाले, सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नाहीत त्यांचे नेते अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांचेही नेते अमित शाह आहेत. अमित शहा नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसून देवेंद्र फडणवीस यांना आपण गृहमंत्री असल्याचे माहीत नाही. रोज नागपूर, मुंबई आणि राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. पण आमचे गृहमंत्री राजकारण करत फिरत आहे अशी टीका राऊत यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले, अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच आशीर्वाद देणार नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडण्याचा स्वप्न पाहिलं आहे. मुंबई लुटण्याचं स्वप्न पाहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र कमजोर केला. त्यांना छत्रपतींच्या पायाशी स्थान मिळणार नाही.

तहव्वूर राणा प्रकरणावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारला टार्गेट केलं. ते म्हणाले, तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी २००९ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. आता त्याचे क्रेडीट घेतले जाईल. मग त्याला बिहार निवडणुकी दरम्यान फाशीची शिक्षा दिली जाईल असा दावा करत निवडणुकांसाठी भाजप काहीही करु शकते अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

तहव्वूर राणा प्रमाणे नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांनाही भारतात आणायला हवे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. केवळ राणासारख्या एकाला भारतात आणून मोठा विजय असल्याचे दाखवू नये. त्याला भारतात आणण्याचे श्रेय तत्कालीन सरकारचे आहे. त्या काळात ही प्रक्रिया सुरु झाल्याचे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT