सावंतवाडी मतदारसंघात बूथवर पैसे वाटल्याच्या संशयावरून भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले.
परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने मध्यस्थी करून तणाव नियंत्रित केला.
शिंदे साहेबांच्या दौऱ्यातील बॅगा पैशांनी भरलेल्या नसून त्यात फक्त कपडे असल्याचे स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप फेटाळले गेले.
Sawantwadi News : मालवण नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून लाखोंची रोकड पकडली. तसेच त्या बॅगेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच थेट आरोप केले. यावरून राजकीय रणकंदन माजले होते. हे प्रकरण ताजे असतानाच प्रचार संपल्यानंतर मालवण पोलीसांच्या नाकाबंदीत देवगड येथील एका गाडीत लाखो रुपयांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली होती.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप उर्फ बाबा परब आणि निलेश राणे आमने-सामने आले होते. यामुळे येथे पहाटेपर्यंत हाय हॉल्ट व्होल्टेज ड्रामा पहाटे सुरू होता. अशातच आज मंगळवारी (ता.२) प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही सावंतवाडी मतदारसंघात बुथवर पैसे वाटले जात असल्याच्या संशयावरून भाजप आणि शिवसेनेत वाद झाल्याची माहिती मिळत आहे. येथे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणाव निर्माण झाला होता.
नुकताच मालवण नगरपालिका निवडणुकीत निलेश राणे यांनी भाजपवर आरोप चढवले होते. त्यांनी रवींद्र चव्हाण यांची प्रचार सभा झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून लाखोंची रोकड पकडली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला होता. यामुळे महायुतीतच काहीसा गोंधळ निर्माण झाला असून राजकीय रणकंदन माजले होते.
याचदरम्यान बुधवारी (ता.३) होणारी मतमोजणीही पुढे ढकलण्यावरून नितेश राणेंनी नाराजी व्यक्त करत, मला हरवण्यासाठी आता सेटींग केली जात असावी असा दावा केला होता. तसेच मालवण पोलीसांना नाकाबंदीत दरम्यान देवगड येथील एका गाडीत लाखो रुपयांची रोकड सापडून आल्याने एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे या गाडीसह चालणाऱ्याला सोडविण्यासाठी आलेल्या भाजपच्याच पदाधिकाऱ्याच्या गाडीला नंबरचा नसल्याचे आढळले होते. याप्रकरणानंतर येथे भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच आक्रमक बनलेले निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह मालवण पोलीस ठाणे गाठले होते. त्याचवेळी मालवण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप परब आणि अजिंक्य पाताडे ही तेथे पोहचले होते. त्यांच्याकडून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल जात होता. यावरून संबंधित कार मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा निलेश राणेंनी घेतला,त्यामुळे येथे ऐन निवडणुकीच्या आदल्या रात्री मालवणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.
यानंतर आता जिल्ह्यातील माजी मंत्री तथा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातही भाजप आणि शिवसेना वाद विकोपाला गेला आहे. ऐन मतदानादिवशी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपकडून बूथवर पैसे वाटले जात असल्याच्या आरोप केला आहे.
हा आरोपच आता येथे वादाचे कारण बनले आहे. सावंतवाडी मतदारसंघात भाजपकडून बूथवर पैसे वाटले जात असल्याच्या संशयावरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वाद घातला. या घटनेनंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, मालवणमध्ये सभेसाठी आलेल्या एकनाथ शिंदेंनी जनतेसाठी कोणतेही घोषणा केली नाही. मात्र येताना त्यांनी आणलेल्या दोन जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशाचं रात्रभर वाटप झालं असा खळबळजनक आरोप वैभव नाईक यांनी केला.
यावरही शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले असून हेलिकॉप्टरने प्रवास न करता गाडीने प्रवास केल्यामुळे बॅगा सोबत होत्या. त्यात केवळ कपडे होते, असा दावाही केसरकर यांनी केली आहे. तर विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत, या प्रकरणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
FAQs :
1. सावंतवाडीत वाद कशामुळे झाला?
बूथवर पैसे वाटले जात असल्याच्या संशयामुळे भाजप आणि शिंदे सेना कार्यकर्त्यांत वाद झाला.
2. पोलिसांनी काय कारवाई केली?
पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
3. शिंदे साहेबांच्या बॅग प्रकरणाचे खरे काय?
दौऱ्यात हेलिकॉप्टरऐवजी गाडीने प्रवास केल्याने बॅगा बरोबर होत्या आणि त्यात फक्त कपडे असल्याचे सांगितले गेले.
4. विरोधक कोणते आरोप करत आहेत?
बॅगांमध्ये पैसे असल्याचा आणि त्या वाटल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.
5. या वादाचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो का?
स्थानिक तणाव वाढल्याने काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, पण परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.