Shivsena Vs BJP : शिवसेना-भाजप आमदारांचे जमेना, आता थेट एकनाथ शिंदेंकडे तक्रार; CM फडणवीसांशी बोलण्याची विनंती

Narendra Bhondekar VS Parinay Phuke : आमदार नरेंद्र भोंडेकर हे आमदार परिणय फुके यांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे.
Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Ekanth Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Narendra Bhondekar News : नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंची शिवसेनेचे आमदार आणि भाजप आमदारांमधील वाद उफाळून आले आहेत. कोकणात निलेश राणेंनी भाजपला आव्हान दिले आहे. तर, हिंगोलीत आमदार संतोष बांगरांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. आता भंडारा जिल्ह्यात देखील आमदार नरेंद्र भोंडेकर हे भाजप आमदार परिणय फुकेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

भोंडेकर आणि फुके यांच्यातील तणाव निवडणुकीच्या काळात आणखी वाढला आहे. आमदार भोंडेकर यांनी फुकेंची तक्रार थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे करून मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बोलण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधीच एकमेकांवर टीका करीत नाहीत. युती कायम राखण्यासाठी ते नेहमीच संयमाने बोलातात. मात्र भाजपचे आमदार याच्या उलट वागतात. आमच्या जिल्ह्यात फक्त नावालाच मैत्रीपूर्ण वातावरण असून राजकारणाचा दर्जा खालावत चालला असल्याचे आमदार भोंडेकर म्हणाले.

भंडारा जिल्ह्यात भाजपचा एक नेता बेछूट आरोप करतो. महिलांविषयी अपशब्दात बोलून वातावरण खराब करतो,अशा लोकांना रोखा, गरज भासल्याच आपण सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करावी, असे देखील भोंडेकरांनी सांगितले.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Sushma Andhare Video : 'नरेंद्र मोदींचा जीव काँग्रेसने वाचवला, नाहीतर पांगुळगाडा...', सुषमा अंधारेंचा रवींद्र चव्हाणांवर पलटवार

राज्यात आपली युती आहे. स्थानिक निवडणुकीतही युती कायम राहली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढत होत असताना एकमेकांवर आरोप करू नका, संयम बाळगा, युतीतील वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या असा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या केल्या आहेत. मात्र त्या भाजपच्याच नेत्यांकडून पाळल्या जात नाही, असे देखील ते म्हणाले.

भाजप-शिवसेनेतील वाद विकोपाला

विधान परिषदेच्या निवडणुकीत जेव्हा मतदानाची गरज भासते तेव्हा आम्ही महायुतीत म्हणून सर्व मदत करतो. मात्र जेव्हा आमची वेळ येते, गरज भासते तेव्हा शिवसेनेसाठी दरवाजे बंद केले जातात. शिवसेना मोठा पक्ष आहे. राज्यात सत्तेत आहे. शिवसेनेकडेही उमेदवार आहेत असे सांगून त्यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांची तक्रार केली. यावरून भंडारा जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याची चर्चा आहे.

Ekanth Shinde, Devendra Fadnavis
Beed Municipal Election : फडणवीस, अजितदादा, पंकजा मुंडे, धनुभाऊंनी लक्ष घातलं... बीडचा क्षीरसागरांचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी सर्वपक्षीय धडपड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com