नगरपालिका निवडणुकीतील पराभव आघाडीतील विसंवादामुळे झाल्याचा निष्कर्ष राष्ट्रवादीने काढला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषद गटांसह पंचायत समितीचे सर्व गण लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
Ratnagiri News : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीतील पराभव हा आघाडीतील बिघाडी आणि विसंवादामुळे झाला असल्याचा स्पष्ट निष्कर्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काढला आहे. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढवण्याचा ठाम निर्णय देखील पक्षाने घेतला आहे. यामुळे नगरपालिका निवडणुकीतील झालेल्या पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागल्याचे आता समोर येत आहे.
चिपळूण तालुका हा पुरोगामी विचारांचा असून, येथील जनता शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या सर्वच्या सर्व जागा पक्ष स्वतःच्या ताकदीवर लढवेल, असा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.
निव्वळ धनशक्ती, अहंकार, लोकशाही मुल्यांचा अनादर आणि पुरोगामी विचारांना तिलांजली देत जहाल विचारांच्या संगतीने भाजपाच्या खुंटीला स्वतःला बांधून घेतलेल्या नेतृत्वाविरोधात ही लढाई असल्याचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी स्पष्ट केले.
हे आवाहन सत्ताधारी पक्षांच्या विरोधात असले तरी चिपळूण तालुक्यातील सुजाण जनता या निर्णयाचे स्वागत करेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ला मोठे पाठबळ देईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने रामपूर जिल्हा परिषद गटाची महत्त्वपूर्ण बैठक आज तालुकाप्रमुख मुरादभाई अडरेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ पदाधिकारी नंदूशेठ शिर्के, प्रकाश साळवी, नंदू सावंत, नीलेश चव्हाण, महेश कातकर, विक्रम साळुंखे, गणेश चव्हाण, केशव जाधव, नारायण कामेरकर, गणेश गांधी यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व गण लढवण्यावर शिक्कामोर्तब
या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत रामपूर जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीचे सर्व गण लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी उपतालुकाध्यक्ष नीलेश चव्हाण इच्छुक असून, उमरोल व गुढे गणांसाठी अनेक इच्छुक उमेदवार असल्याने स्थानिक जनता जो निर्णय देईल त्यालाच उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा विश्वास सर्वांनी एकमुखाने व्यक्त केला.
Q1. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय का घेतला?
➡️ आघाडीतील विसंवाद आणि बिघाडीमुळे नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
Q2. हा निर्णय कोणत्या गटाचा आहे?
➡️ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांचा हा निर्णय आहे.
Q3. कोणत्या निवडणुकांसाठी स्वबळावर लढणार?
➡️ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी.
Q4. यापुढे कोणत्याही पक्षाशी आघाडी होणार नाही का?
➡️ सध्या तरी कोणत्याही पक्षाशी आघाडी न करण्याचा ठाम निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Q5. या निर्णयाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
➡️ स्थानिक पातळीवर निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता असून राजकीय चुरस वाढू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.