आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार असा ठाम दावा करण्यात आला आहे.
उरणमधील या नव्या राजकीय समीकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.
Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी मोर्चे बांधणी करत असून विरोधी पक्षातील महत्वाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षात पक्षप्रवेश करून घेत आहेत. यामुळे ठाकरेंची शिवसेनेसह शेकाप पक्षाला फटका बसला आहे. अशावेळी शेतकरी कामगार पक्ष पुन्हा एकदा पक्ष बांधणीला लागला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीही सज्य झाला आहे. तर आगामी स्थानिकमध्ये शेकापची ताकद काय आहे हे दाखवून देऊ, असाही निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
तालुक्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी नुकतीच जेएनपीटी टाऊनशिप येथे शेतकरी कामगार पक्षाची विस्तारित बैठक झाली. यावेळी शेकाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाची पूर्वीपासून ताकद आहे. पंचायत समितीचा सभापती हा शेकापक्षाचाच असतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण या निवडणुका लढतो आहोत. नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शेतकरी कामगार पक्ष सज्ज आहे. महाविकास आघाडीसोबत एकत्रित या निवडणुका पक्ष लढणार असून आमची ताकद काय आहे ते दाखवून देवू. तर उरणमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची सत्ता अबाधित राहणार असाल्याचा दावाही शेकाप नेते काका पाटील यांनी केले आहे.
शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकांमध्ये भरारी घेऊन आपली निश्चितच ताकद दाखवणार आहे. निवडणुका मित्रपक्षांच्या बरोबर राहून लढणार आहोत. सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर विजय आपलाच आहे, असे मत माजी उपसभापती महादेव बंडा यांनी मांडले आहे.
दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी देखील हातात कमळ घेतले होते. या प्रवेशामुळे आगामी स्थानिकमध्ये शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
तर आपल्या प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप आणखी मजबूत झाली असून जिल्ह्यात एक नंबरला येणार असल्याचा दावा देखील पंडित पाटील यांनी केला होता. तसेच जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडित पाटील काय आहे ते इतरांना कळेल, असा इशारा त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता दिला होता.
1. उरणमध्ये कोणता पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे?
शेतकरी कामगार पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.
2. शेतकरी कामगार पक्ष कोणासोबत आघाडी करत आहे?
शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत काम करण्याचा दावा करत आहे.
3. उरणमध्ये सत्तेचं समीकरण कसं दिसतंय?
शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडी युतीने सत्तेचा दावा केल्यामुळे राजकीय समीकरणात बदल दिसत आहे.
4. ही निवडणूक कोणत्या पातळीवर होणार आहे?
ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगरपालिका आणि पंचायत पातळीवर होणार आहे.
5. या घडामोडींचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
महाविकास आघाडीचा उरणमधील प्रभाव वाढण्याची आणि भाजप-शिवसेना यांच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.