कोकण

शिवसेनेच्या सर्वांत तरुण नगरसेविकेकडून विजयाबद्दल मतदारांना अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’

शिवसेनेच्या नगरसेविका शिवानी खानविलकर यांनी रोपे वाटप करून मानले मतदारांचे आभार

सरकारनामा ब्यूरो

दाभोळ : दापोली नगरपंचायत निवडणुकीत (nagar panchayat election) शिवाजीनगर प्रभागातून शिवसेनेच्या (shivsena) शिवानी खानविलकर या २१ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने विजय मिळवत दापोली नगरपंचायतीच्या इतिहासात सर्वात तरुण नगरसेविका होण्याचा मान पटकावला. विजयानंतर आपल्या प्रभागात मतदारांचे आभार मानताना तिने रोपांचे वाटप करून आपली ओळख मतदारांपर्यंत वर्षांनुवर्षे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Shiv Sena corporator Shivani Khanwilkar distributed saplings and thanked the voters)

निवडणूक आली की, अनेक ठिकाणी मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे वाटप झाल्याच्या चर्चा झडत असतात. मात्र, दापोलीतील शिवाजीनगर प्रभाग याला अपवाद ठरला आहे. या ठिकाणी विजयी झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार शिवानी खानविलकर हिने मतदारांचा आशीर्वाद व शुभेच्छा घेताना आपली ओळख सदैव मतदारांच्या समोर राहावी; म्हणून विविध रोपांचे वाटप केले आहे. तिच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपल्याला राजकारणात रस असून समाजाची सेवा करण्याचे आपले स्वप्न आहे, असे तिने सांगितले. तसेच, भविष्यात नगराध्यक्षपद मिळाल्यास आपण दापोलीकरांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे सांगत दापोली शहराचा विकास हेच आपले ध्येय असल्याचे तिने स्पष्ट केले.

निवडून येण्याचे सर्व श्रेय मतदारांना

शिवानी खानविलकर ही उच्चशिक्षित असून तिचे वडील दापोली शहरात सर्पमित्र म्हणून परिचित आहेत. ते शिवसेनेचे पूर्वीपासूनच कार्यकर्ते आहेत. शिवानी ही आजपर्यंत दापोली नगरपंचायतीच्या इतिहासातील सर्वात तरुण नगरसेविका ठरली आहे. निवडून आल्याचे सर्व श्रेय तिने आपल्या प्रभागातील मतदारांना दिले आहे. आपल्याला राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्‍या आपल्या आई-वडिलांचेही तिने आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT