सावंतवाडी : दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीतील (nagar panchayat election) पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, ते राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत. उलट पुढील निवडणुकांसाठी त्यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात येईल. समोर सधन प्रतिस्पर्धी असताना आमच्या मावळ्यांनी निकराने लढा दिला, असे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांनी सांगितले. (Dodamarg NCP office bearers resignations Will not accept : Archana Ghare-Parab)
अर्चना घारे-परब यांनी दोडामार्ग येथील पदाधिकाऱ्यांकडून दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, दोडामार्ग तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे देत असल्याची घोषणा केली आहे. खरंतर समोर दिल्लीश्वरांचे सधन प्रतिस्पर्धी आमच्या उमेदवारांसमोर होते. त्यांच्याकडे मुबलक साधनसामग्री आणि दारूगोळा ठासून भरलेला होता. त्यांच्यासमोर आमच्या मावळ्यांनी निकराने लढा दिला.
हाती पुरेशी साधनसामग्री नसतानाही आमचे मावळे भिडले. अगदी जिद्दीने लढले. काही जागांवर तर केवळ नशिबाने पडले. त्यांनी दिलेला हा लढा खरोखरच कौतुकास्पद आहे. खरं तर त्याचं कौतुक व्हायला हवं. आमचा कार्यकर्ता स्वाभिमानी आहे. त्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आपण दोडामार्ग येथील पदाधिकाऱ्यांशी आणि जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याशी बोलले आहे. त्यामुळे दोडामार्ग पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत. उलट त्यांनी दिलेल्या या लढ्याबद्दल त्यांचं पक्षातर्फे कौतुक केले जाईल आणि पुढील निवडणुकांमध्ये त्यांना नवीन जबाबदारी दिली जाईल, अशी घोषणा पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.