Vinayak Raut News : अजित पवार गटामुळे महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गटातील 30 ते 40 तिकीटासाठी पक्षांतर करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरेंचे विश्वासू माजी खासदार विनायक राऊत यांनी अजित पवार गटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
'विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गरज सरो वैद्य मरो प्रमाणे अजित पवार गटाला फेकून देतील', असा दावा विनायक राऊत यांनी महायुतीच्या बाबत केला आहे.
विनायक राऊत म्हणाले, मिंधे सरकार हे निवडणुकांपासून फार दूर पळत चालले आहे. निवडणुका या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जातील. मात्र, निवडणुका जवळ येतील तशी भाजपला अधिक गळती लागेल.
समरजीत पाटील यांनी उचललेला पाऊल योग्य आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील मोठे प्रस्थ भाजप आणि शिंदे गट सोडून उद्धव ठाकरे, शरद पवार गट किंवा काँग्रेसमध्ये येतील, असा दावा देखील विनायक राऊत यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे षडयंत्र आहे, असे म्हणणाऱ्यांची कीव येते. नारायण राणे निलेश राणे रितेश राणे हैवान आहेत, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला.लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल, असा दावा देखील राऊत यांनी केला.
निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवताना महाविकास आघाडीत गणेश चतुर्थीनंतर जागावाटप होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच जर वंचित ऐकलं असतं तर आज वंचितचे 3 खासदार किमान महाराष्ट्रात असले असते. आता सोबत येथील का ते पाहू. महाराष्ट्रात कोणत्याही जागेवर जागावाटप झालेले नाही, असे देखील राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.