Harayana Assembly : भाजपला हरियाणात दुसरा धक्का! पहिली यादी जाहीर होताच आमदाराने ठोकला रामराम..!

BJP Candidate list Harayana Assembly : हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादी जाहीर होताच पक्षात खळबळ उडाली आहे.
Ratia MLA Laxman Napa resigned from BJP, will join Congress
Ratia MLA Laxman Napa resigned from BJP, will join CongressSarkarnama
Published on
Updated on

Ratia MLA Laxman Napa : हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादी जाहीर होताच पक्षात खळबळ उडाली. तिकीट नाकारल्याने संतापलेल्या रतियाचे भाजप आमदार लक्ष्मण नापा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी ३ वाजता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. तिकीट न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जात आहे.

भाजपने (BJP) रतिया मतदारसंघातून सुनीता दुग्गल यांना तिकीट दिले आहे. याआधीही भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते समशेर गिल यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले होते. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने 67 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादी जाहीर होताच पक्षात खळबळ उडाली आहे. तिकीट नाकारल्याने संतापलेल्या रतियाचे भाजप आमदार लक्ष्मण नापा यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

Ratia MLA Laxman Napa resigned from BJP, will join Congress
MCD Election : दिल्लीत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; निवडणुकीत ‘आप’ला मोठा धक्का

हरियाणा (hariyana) भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंद मंडी आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कर्णदेव यांनीही पक्ष सोडला. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी निवडणूक (Election) होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना उमेदवारी देण्याबरोबरच भाजपने अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या अनेकांना तिकीट दिले आहे. यामुळे अनेक नेते नाराज झाले आहेत. लक्ष्मण नापा यांचे तिकीट रद्द करून पक्षाने रतियामधून सुनीता दुग्गल यांना उमेदवारी दिली आहे. दुग्गल हे सिरसा येथून खासदार राहिले आहेत. तिकीट जाहीर होताच आमदार लक्ष्मण नापा यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली.

Ratia MLA Laxman Napa resigned from BJP, will join Congress
Supreme Court : मुख्यमंत्री आहात म्हणून काहीही कराल का? सुप्रीम कोर्टाने फटकारले

हरियाणा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुखविंदर मंडी आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कर्णदेव हेही भाजपकडून तिकिटाची मागणी करत होते. पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत दोन्ही दिग्गजांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com