MLA Mahendra Dalvi Latest NewsLatest Marathi News
MLA Mahendra Dalvi Latest NewsLatest Marathi News Sarlarnama
कोकण

आमदार महेंद्र दळवींना दणका; रायगडमध्ये शिवसेनेत मोठी उलथापालथ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्य बंडानंतर शिवसेनेत उलथापालथ सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. शिंदे गटात सामील झालेले आमदार महेंद्र दळवी यांना जिल्‍हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं आहे. तसेच इतर पदांवरून त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांना हटवण्यात आल्याचे समजते. (MLA Mahendra Dalvi)

रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. पण गडातही शिवसेनेला धक्का बसला आहे. महेंद्र दळवी यांनी शिंदे यांचं नेतृत्व मान्य केल्यानं जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यानंतर आता शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची अदलाबदली करत कार्यकर्त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आमदार दळळी यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवत सुरेंद्र म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांनाही हटवण्यात आलं आहे. त्यांची जागा आता शंकर (प्रसाद) गुरव यांनी घेतली आहे. सहसंपर्कपदाची जबाबदारी किशोर जैन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे शिवसेनेत (ShivSena) दोन गट पडले आहेत. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सत्ता वाचवण्यासाठी कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांच्या भाजपच्या नेत्यांशी भेटीगाठी सुरू असल्याची समजते.

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज सकाळी टि्वट करीत शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. या टि्वटची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा फोटो राऊतांनी पोस्ट केला आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले, "गुवाहाटीत किती दिवस लपून बसणार, चौपाटीवर यावं लागेल," राऊत यांनी सामनातील अग्रलेखात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नाही.असे अनेक भूकंप होऊनही शिवसेनेचे अस्तित्व अबाधित राहिले आहे. या नाटकाचे खरे सूत्रधार भाजपचे दिग्दर्शक आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT