Rajendra Gavit sarkarnama
कोकण

शिवसेना खासदाराला कोर्टाचा दणका; 1 वर्षाचा तुरुंगवास अन् पावणेदोन कोटीचा दंड!

महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दुसरा धक्का बसला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पालघर : शिवसेनेचे (ShivSena) पालघरचे खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. त्यांना एका प्रकरणात एक वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दुसरा मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना एका प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर राजेंद्र गावित यांनाही पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने शिक्षा ठोठावली.

जागेच्या व्यवहारातून गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता गावित यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ह्या निर्णया विरोधात आपण लवकर सत्र न्यायालयात जाणार असल्याचे गावीत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान, आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना तीन दिवसांपूर्वी चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यपद रद्द करा, अशी मागणी याचिकाकर्ते तिरमारे यांनी केली होती. दरम्यान, या प्रकरणी आता बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात जाण्यार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT