Vinayak Raut  Sarkarnama
कोकण

सिंधुदुर्गमधील वाद संपेना : सेना खासदाराला जिवे मारण्याची दिवसभरात 15 वेळा धमकी

सिंधुदुर्ग (Sindhudurg) पोलिसांनी राणे समर्थकांना अटक केल्याची माहिती

रामनाथ दवणे

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निकालाचे पडसाद अजून उमटत असून शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांंनाच जिवे मारण्याची धमकीचे दूरध्वनी येत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.

राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांना एका दिवसात काल पंधरा फोन आले होते. फोनवर अर्वाच्च शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली. वाकोला पोलिसांकडे याबाबत त्यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी एका राणे समर्थकाला ताब्यात घेतले असल्याचा दावा केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक वादाची ठरली आहे. बॅंकेचे माजी अध्यक्षाच्या प्रचाराप्रमुखाला मारहाण झाल्याबद्दल आमदार नितेश राणे यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिस प्रयत्नीशील आहेत. राणे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात दाद मागण्यासाठी निकालाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आहे. हा वाद एकीकडे सुरू असतानाच थेट सेना खासदारालाच धमक्या येण्याचा प्रकार घडला आहे. ही निवडणूक चुरशीची झाली होती. या नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळवला.

राऊत यांनी या वेळी विविध विषयांवर भाष्य केले. `इंडिया टुडे`ने केलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टॉप पाचमध्ये आले आहेत. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कामाची पावती मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजप नेहमी उद्धव ठाकरे यांच्या कामावर आरोप करत राहिली पण या सर्वेक्षणाने भाजपलाही उत्तर मिळाल्याचे मत राऊत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नथूराम गोडसेची भूमिका साकारत असल्याबद्दल राऊत यांनी सावध प्रतिक्रिया दिली. अमोल कोल्हे हे कलाकार आहेत. ते वेगवेगळ्या भूमिका सादर सादर करत असतात. अमोल कोल्हे यांचा चित्रपट मी पाहिलेला नाही. पाहिल्यानंतर काय भूमिका आहे, हे सांगणे बरे पडेल, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT