अखंडपणे 50 वर्षे प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योत' आज विझणार; मोदी सरकारचा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी कार्यक्रम होणार आहे.
Amar Jawan Jyoti
Amar Jawan JyotiSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : इंडिया गेटवर (India Gate) मागील पन्नास वर्षांहून अधिक काळापासून प्रज्वलित असलेली 'अमर जवान ज्योती' (Amar Jawan Jyoti) आज कायमची विझणार आहे. ही ज्योती आता राष्ट्रीय युध्द स्मारक (National War Memorial) येथे प्रज्वलित केली जाणार आहे. मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

राष्ट्रीय युध्द स्मारक येथेही ज्योत आता दोन वेगळ्या ठिकाणांऐवजी केवळ युध्द स्मारकातच ज्योत अखंडपणे प्रज्वलित ठेवली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय युध्द स्मारकाचे लोकार्पण केले आहे. या स्मारकात विविध युध्दांमध्ये शहीद झालेल्या 25 हजार 942 जवानंची नावे कोरण्यात आली आहे. हे स्मारक 40 एकर जमीनीवर विखरलेले असून त्यासाठी 176 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

Amar Jawan Jyoti
अखिलेश यांची मोठी खेळी; योगींविरोधात त्यांच्याच उत्तराधिकाऱ्याची पत्नी मैदानात

पहिल्या महायुध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ ब्रिटिश सरकारने इंडिया गेटची उभारणी केली होती. त्यानंतर 1972 मध्ये 1971 च्या पाकिस्तान (Pakistan) युध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ तिथे अमर जवान ज्योती प्रज्वलित करण्यात आली. या युध्दात भारताचा विजय झाला आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 26 जानेवारी 1972 रोजी या ज्योतीचे लोकार्पण केले होते.

लष्कराती अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर जवान ज्योतीला शुक्रवारी दुपारी राष्ट्रीय युध्द स्मारकावरील प्रज्वलित ज्योतीमध्ये विलय केली जाईल. इंडिया गेट व युद्ध स्मारकामध्ये केवळ 400 मीटरचे अंतर आहे. दोन्ही ठिकाणांच्या ज्योतीची देखभाल करणे कठीण जात आहे. तसेच देशातील सर्व शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ युध्द स्मारक बनवण्यात आले आहे. त्यांचे कुटुंबीयही तिथेच येतात. त्यामुळे अमर जवान ज्योत वेगळी प्रज्वलित नसावी, असंही लष्करातील सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com