Sunil Tatkare Bharat Gogawale Sarkarnama
कोकण

Bharat Gogawale : शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष शिगेला! गोगावलेंनी राष्ट्रवादीची औकात काढली; तटकरेंचाही पलटवार, म्हणाले....

NCP Aniket Tatkare on Bharat Gogawale Over Sunil Tatkare : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. येथे मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला डिवचलं आहे.

Aslam Shanedivan

  • महाडमध्ये भरत गोगावले यांनी धावीर महाराजांच्या नावाने शपथ घेण्याचं आव्हान देत अनिकेत तटकऱ्यांवर गंभीर आरोप केले.

  • तटकरे यांनी हे आव्हान स्वीकारत पालटवार करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्याचा दावा केला.

  • या संघर्षामुळे रायगड जिल्ह्यातील शिवसेना-राष्ट्रवादी तणाव अधिक वाढला असून राजकारण चांगलेच तापले आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत थेट औकात काढली होती. तसेच अवघ्या महाराष्ट्रातून तुमची लोकसभेला एकमेव सीट आम्ही निवडून आणली. आमच्यापैकी एकाही आमदाराने जरा वाकडी मान केली असती तर तुमचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते अशा शब्दांत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना फटकारले होते.

तसेच तटकरे यांनी विधानसभेला शिवसेनेच्या विरोधात काम केलं असा आरोप केला होता. तर हे खोटं असेल तर त्यांनी महाडच्या ग्रामदैवताची शपथ घ्यावी असे चॅलेंज दिले होते. ज्यानंतर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आता हे चॅलेंज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी स्वीकारलं असून त्यांनी गोगावलेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

गोगावले यांनी राष्ट्रवादीसह तटकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती. त्यांनी आम्ही महाराष्ट्रात युती म्हणून काम केलं. अख्या महाराष्ट्रात तुमचा सुपडा साफ झाला असून फक्त एक जागा आम्ही निवडून आणली. येथे महेंद्रशेठ, रवीशेठ आणि मी थोडीशी जरी मान वाकडी केली असती तर यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते. नाहीतर तुमची काय औकात होती? अशी टीका केली.

विधानसभा निवडणुकीत तटकरे यांनी आपल्या विरोधात काम केलं असा आरोपही गोगावले यांनी केला होता. तर महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांच्या डोक्यावरील फुल उचला, ज्याने कुणी चुकीचं केलं असेल त्यांना भोगावं लागेल असं गोगावले म्हणाले आहेत.

आम्ही चुकलो असेल तर आम्ही चार पावलं मागे येवून नमस्कार करू. पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत नाही. हा आमचा बाना आहे, असेही म्हणत 'त्यांचा एक दिवस तरी जय महाराष्ट्र करणार' असा इशाराही दिला होता.

या आरोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी हे आव्हान स्वीकारत गोगावलेंचा समाचार घेतला आहे. त्यांनी, हाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज असो तेथील फुलच काय तर तेथील नारळ ही उचलायची माझी तयारी आहे.

आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणाने काम केलं आहे. मग ते तिकडे महेंद्र दळवींचं असो किंवा शिवसेनेचे उमेदवार गोगावले असो. पण आता फक्त एका विशिष्ट पदा करताच असे नरेटीव्ह टीका केली जात आहे. पण याची सुरूवात त्यांनी केली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदारांचं काम प्रामाणिकपणे केल्याचंही तटकरे यांनी सांगितलं आहे.

FAQs :

1. भरत गोगावले यांनी अनिकेत तटकऱ्यांना कोणतं आव्हान दिलं?
धावीर महाराज आणि विरेश्वर महाराजांच्या फुलं उचलून शपथ घ्यावी किंवा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असं त्यांनी सांगितलं.

2. गोगावले कोणत्या मुद्द्यावर तटकऱ्यांवर आरोप करत आहेत?
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रामाणिक काम न केल्याचा आरोप त्यांनी केला.

3. अनिकेत तटकऱ्यांनी आव्हान स्वीकारलं का?
होय, त्यांनी आव्हान स्वीकारत गोगावलेंना करारा उत्तर दिलं.

4. या प्रकरणामुळे महाडमध्ये काय परिस्थिती आहे?
राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना-राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

5. गोगावले यांचा ‘जय महाराष्ट्र’ संदर्भ काय आहे?
गोगावले म्हणाले की, तटकऱ्यांना ‘एक दिवस तरी जय महाराष्ट्र करायला लावणार’.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT