Nitesh Rane  sarkarnama
कोकण

आम्ही एका गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला निवडून दिलं! कणकवलीत आत्मक्लेश आंदोलन

भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकेवरून कोकणातील राजकारण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकेमुळे कोकणातील राजकारण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एका आमदाराला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक झाल्याचा दावा संदेश पारकर (Sandesh Parkar) यांनी केला आहे. आम्ही एका गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला निवडून दिले, त्यामुळे प्रायश्चित म्हणून पारकरांनी आज आत्मक्लेश आंदोलन केले. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला आहे.

दिवंगत आमदार अप्पासाहेब पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कणकवलीच्या भूमीत हे घडत आहे. त्यामुळे गोपुरी आश्रम येथील पटवर्धन यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना (Shivsena) नेते संदेश पारकरांनी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, संतोष परब यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना संदेश पारकर म्हणाले की, आमदार नितेश राणे यांना शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटक झाली आहे. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एका आमदाराला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. आम्ही एका गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला निवडून दिले आहे. त्यामुळे याचे प्रायश्चित करण्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.

राणेंच्या जामिनावर आज निर्णय

दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने राणेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. राणेंच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवणुकीआधी परब यांच्यावर हल्ला झाला होता. परब हे महाविकास आघाडीच्या पॅनेलचे प्रचारप्रमुख होते. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर कोकणातील राजकारण तापले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT