Mahendra Thorve on Sunil Tatkare Sarkarnama
कोकण

Mahendra Thorve on Sunil Tatkare : रायगडमध्ये शिंदे शिवसेनाविरुद्ध तटकरे संघर्ष पेटला! टोरंट प्रकल्पावरून महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादीला थेट इशारा

Shiv Sena MLA Mahendra Thorve targets Sunil Tatkare over the Torrent Power project Raigad and warns protest against proposed factory Khalapur : टोरंट प्रकल्पाच्या समर्थनावरून महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने; सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत थोरवेंनी खालापूरमधील नियोजित कारखान्याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

Pradeep Pendhare

Torrent Power Project Raigad : महायुतीमधील एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोकणात पटेनासे झाले आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते नेहमीच आक्रमक दिसतात.

आता सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेनेचे कर्जतचे स्थानिक नेते आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचा साडू अन् मुलाची भागीदार असलेला नियोजित कारखान्यावर जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला. खासदार तटकरे यांनी टोरंट प्रकल्पाला केलेल्या विरोधावरून आमदार थोरवे यांनी ही भूमिका घेतल्याचे दिसते आहे.

कर्जतचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणाघात करताना म्हणाले, "केंद्र आणि राज्य सरकारने टोरंटला मंजुरी दिली आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतील पक्ष आहे. सत्तेत बसून मलिदा खायचा आणि सरकारने टोरंटला विरोध करायचा. खालापूर तालुक्यातील चिलठण येथे सुनील तटकरे आणि त्यांचा साडू, मुलगा यांचा भागीदार असलेला कारखाना येत आहे. दारूमुळे रोग होत असताना पर्यावरण पूरक टोरंटला विरोध करत आहेत. त्यांच्या या कारखान्या विरोधात लवकरच शिवसेनेच्य वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल."

पर्यावरणप्रेमी देखील या प्रकल्पाविरोधात भूमिका घेत आक्रमक झालेले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यासह अनेकांनी राजकीय, सामाजिक, पर्यावरण प्रेमी संघटनांनी टोरंट प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. याच प्रकल्पावरून महायुतीत (Mahayuti) मतभेद आहे. स्थानिक राजकारणाची त्याला झालर आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील टोरंट पॉवर प्रकल्पाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी सध्याच्या स्वरूपाला आणि मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध दर्शवणाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रकल्पाविरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. रायगड जिल्ह्यात निसर्गाचा आणि नद्यांचा ऱ्हास करणारे प्रकल्प नको. विकास कामांना पाठिंबा असला तरी तो निसर्गाचा वाळवंट करून किंवा स्थानिकांवर अन्याय करून होऊ नये, अशीच भूमिका सुनील तटकरेंनी टोरंट प्रकल्पाच्या बाबत घेतली आहे.

परंतु एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी टोरंट प्रकल्पाचे समर्थन करत असून, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते कंपन्यांना व प्रकल्पांना अवाजवी विरोध करत असल्याचा आरोप केला आहे. यातूनच पुढे महेंद्र थोरवे यांनी, प्रकल्पाला विरोध करणारे तटकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, खालापूर येथे तटकरेंची भागीदारी असलेल्या कारखान्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

टोरंट प्रकल्पाचा वाद बाजूला राहिला असतानाच, महेंद्र थोरवे यांनी, विरोध करणारे तटकरेंचा वेगळाच मुद्दा समोर आणत घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोकणात, विशेष करून रायगड जिल्ह्यात एकनाथ शिंदे शिवसेना आणि सुनील तटकरे यांच्यात वाद नेहमीच धुसफूत असतात. विधानसभा निवडणुकीपासून ते भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळण्यापर्यंत तटकरेविरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना असा वाद पेटलेला होता. आता देखील टोरंट प्रकल्पावरून वाद पेटताना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT