दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोव्यात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी बांदा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून आंदोलन केले आणि गोवा पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप केला.
दरम्यान आमदार जीत आरोलकर यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाल्याची माहिती मिळाली आहे.
Goa Crime News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण झाल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून ही घटना गोव्यात घडली. ज्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी बांदा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. ज्यामुळे मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तर संतप्त शिवसैनिकांनी गोवा पोलीस आणि मुख्यमंत्र्यांनी योग्य ती दखल न घेतल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान गोव्यातील आमदार जीत आरोलकर यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.
गोव्यात पर्यटकांच्या सुरक्षेबाबत धक्कादायक प्रकार थांबता थांबत नसल्याचे सध्याचे चित्र समोर येत आहे. सुटीसाठी गोव्याला गेलेल्या एका मराठी कुटुंबाच्या खोलीत, रात्रीच्या वेळी हॉटेल कर्मचाऱ्याने मास्टर की वापरून शिरण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोलवा येथील ही घटना ताजी असतानाच सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील सूरज परब यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला स्थानिक युवकांकडून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर यानंतर संतप्त झालेल्या संबंधित कुटुंबीयांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी-बांदा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. या घटनांमुळे गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान आता केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सूरज परब आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोव्यात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यात स्थानिक तरुणांनी दारूच्या नशेत त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली असून या तरुणांनी त्यांच्या कुटुंबीयांना देखील सोडले नाही. या घटनेमुळे आता तळकोकणात मोठी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून एकच खळबळ उडाली आहे. संतप्त शिवसैनिकांनी रास्तारोको करत या घटनेनंतर कडक कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील रहिवासी असलेले सूरज परब आणि त्यांचे कुटुंबीय गोव्यात फिरायला गेले होते. दरम्यान, गोव्यातील मांद्रे येथे किरकोळ कारणावरून त्यांचा एका व्यक्तीबरोबर वाद झाला. या वादानंतर सुमारे ४० जणांच्या टोळक्याने परब आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. यावेळी परब यांनी गोवा पोलिसांकडे मदतीची मागणी केली. मात्र पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे देखील तक्रार करूनही त्यांनी या प्रकरणाची योग्य ती दखल घेतली नाही, असा आता आरोप करण्यात येत आहे.
या मारहाणीचे पडसाद आता तळकोकणात उमटले असून संतप्त शिवसैनिकांनी महाराष्ट्र गोवा सीमेवरील बांदा येथे मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. ज्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. तणावाचे वातावरणही निर्माण होवून बाचाबाची देखील झाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाली. तसेच या प्रकरणावर रात्री उशिरा गोव्यातील आमदार जीत आरोलकर यांनी दोन्ही पक्षांशी चर्चा करून हे प्रकरण सामोपचाराने मिटवले. यानंतर आता या प्रकरणावर पडदा पडला आहे.
सूरज परब हे शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक आहेत.
ही घटना गोव्यात घडल्याची माहिती समोर आली आहे.
गोवा पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही असा आरोप करत शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून आंदोलन केले.
महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
गोव्यातील आमदार जीत आरोलकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झाल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.