MLA Rajan Salvi Sarkarnama
कोकण

Rajan Salvi : 'ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर...' राजन साळवींचा प्रशासनास इशारा

सरकारनामा ब्युरो

Ratnagiri Hospitals News : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय उपजिल्हा रुग्णालयांमधून वैद्यकीय अधिकारी नसल्याच्या तक्रारी येत आहेत, अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. अशातच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालय व रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

लांजा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारपर्यंत वैद्यकीय अधिकारी हजर न झाल्यास रुग्णालयाला थेट टाळे ठोकण्याचा इशारा आमदार राजन साळवी यांनी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

लांजा ग्राम रुग्णालयात कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने उपलब्ध नाहीत अशा स्वरूपाच्या अनेक तक्रार येत होत्या या सगळ्याची दखल घेत लांजा राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह लांजा ग्रामीण रुग्णालयात धडक भेट दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे रुग्णालय असतानाही या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला जाब विचारला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजचे डीन यांची ही भेट घेऊन रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात भुलतज्ञ नाहीत, टेक्निशियन नाहीत, डॉक्टर कमी आहेत या सगळ्या समस्यांबाबत चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेच्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शांत बसणार नाही, असा इशाराही दिला.

रत्नागिरी- लांजा ग्रामीण रुग्णालयात मुख्य डॉक्टर नसल्याने आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आक्रमक भूमिका घेत लांजा येथे उपस्थित असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक फुले यांना आणि प्रशासनाला जाब विचारला. तसेच गुरुवारपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून जर लांजा ग्रामीण रुग्णालयात एमबीबीएस डाॅक्टर हजर झाले नाहीत, तर रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राजन साळवी काय म्हणाले?

मीडियाशी बोलताना आमदार साळवींनी सांगितले, 'लांजा येथील ग्रामीण रुग्णालयास आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने भेट दिली आहे. या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती फुले उपस्थित होत्या. त्यांच्याकडे संपूर्ण तालुक्यातील लोकांची कैफियत मांडण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे मुख्य डॉक्टर आवश्यक आहेत, ते मागील अनेक महिन्यांपासून इथे उपलब्ध नाहीत. त्यांना आम्ही आमच्या शिवसेना स्टाइलने इशारा दिलेला आहे.'

तसेच 'गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत इथे एमबीबीएस डॉक्टर हजर झाला नाही, तर या रुग्णालयास आम्ही कुलूप ठोकू आणि बंद करू असा इशारा आम्ही दिलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की, गुरुवारपर्यंत या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर हजर होऊन लोकांना सेवा मिळेल अशी माझी अपेक्षा आहे,' असंही त्यांनी म्हटलं.

याचबरोबर 'आज सकाळीसुद्धा रत्नागिरीत जे रुग्णालयप्रमुख आहेत त्यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा रुग्णालयामधील ज्या अडचणी आहेत, रिक्त पदं आहेत यासंदर्भात चर्चा केली. ग्रामीण भागातील जनतेच्या जिवाशी खेळणयाचा प्रयत्न केला तर शिवसेना (उबाठा) शांत बसणार नाही,' असा इशारा यावेळी आमदार साळवी यांनी दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT