Ratnagiri Politics : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून भाजप-शिंदे गटात जुंपली; आता उदय सामंतांचे मोठे विधान

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency Politics Uday Samant Reaction : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच...
Uday Samant, Ravindra Chavan
Uday Samant, Ravindra Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा विषय सध्या चर्चेत आहे. यावरून आता शिवसेनानेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही भाष्य केले आहे. हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला जातोय. मंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर Uday Samant यांनी ही प्रतिक्रिया आली आहे.

Uday Samant, Ravindra Chavan
Ratnagiri Political News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नवा 'ट्विस्ट'

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक जवळपास सव्वा लाखाचे मताधिक्य हे रत्नागिरी जिल्ह्यातून युतीच्या उमेदवाराला आम्ही दिले होते, असे उदय सामंत म्हणाले. तसेच कोणीही दावा केला म्हणून त्याला मतदारसंघ मिळणार नाही. महाराष्ट्रात 48 जागांवर कोणीही कुठेही दावा करू शकतो. आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढलेला आहे किंवा भाजपाचा असेल आणि त्या ठिकाणी बदल करायचा असेल तर हे अधिकार बोलणाऱ्यांना नाहीत, असेही सामंत यांनी सुनावले. या सगळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा हे जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील, असे सामंत स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून फार मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे आम्ही शिवसेनेचा दावा केलेला असून हा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. किरण सामंत इच्छुक असतील तर त्यांना आम्ही निवडून आणू, असे ते म्हणाले. या मतदारसंघात माझा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ येतो आणि मागच्या वेळेला सर्वाधिक मताधिक्य आपण दिले होते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे या मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असल्याचे सांगितले.

दरम्यान, 'किरण सामंत को कौन रोकेगा?' ही व्हाॅट्सअप स्टेटस लाईन किरण सामंत यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 'कौन बनेगा खासदार'' याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच कोण कोणाला रोखणार हे आता काही दिवसांतच समजेल.

edited by sachin fulpagare

Uday Samant, Ravindra Chavan
Kiran Samant News: रोकेगा कौन ? भाजपला चॅलेंज,व्हाॅट्सअपला स्टेट्स ठेवत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com