Yogesh Kadam and Uddhav Thakary Sarkarnama
कोकण

Yogesh Kadam : '...तर यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव असू शकतं नाही' ; योगेश कदमांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र!

सरकारनामा ब्यूरो

Ratnagiri News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार योगेश कदम यांनी पक्षप्रवेश करून घेण्याचा सपाटात लावल्याचे दिसत आहे. शिवसेनेकडे यापूर्वी दापोली तालुक्यातील 85 ग्रामपंचायती होत्या आता ही संख्या 86 झाली आहे. आमखोल या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी आमदार योगेश कदम(Yogesh Kadam) यांनी पत्रकार परिषद घेत अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना, 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतून जनताच उत्तर देईल, असे म्हणत प्रत्युत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

22 जानेवारी रोजी प्रभू रामचंद्र यांच्या श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. ज्या बाळासाहेबांनी बाबरी पडल्याची जबाबदारी घेत होय आमच्या शिवसैनिकांचा हातच नव्हे तर पाय होता, पूर्ण शिवसैनिक त्यामध्ये सामील होता असं ठणकावून सांगितले होते. आज त्यांचे चिरंजीव या कार्यक्रमावरती राजकीय टीका करत असतील तर यापेक्षा दुसरं मोठं दुर्दैव असू शकतं नाही. असे सांगत, आपण कोणामुळे राजकारणात आहोत आपण कोणाचे चिरंजीव आहोत ही जाणीव उद्धव ठाकरेंनी ठेवायला हवी असाही, टोला योगेश कदम यांनी लगावला आहे.

ज्या बाळासाहेबांमुळे आपण हा भाग्याचा दिवस पाहतो आहोत. हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राजकारण करावे हे दुर्देवी असून काँग्रेसबरोबर राहून त्यांचे विचारही आता बदलल्याची टीका आमदार योगेश कदम यांनी केली.

योगेश कदम म्हणाले, काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे विचार देखील तसेच झाले आहेत अस मी समजतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्याना एकत्र करून सलोखा ठेवण्याचे काम करत आहेत. त्यांचे हात आम्ही तरुणांनी बळकट केले पाहिजेत. अशावेळी उद्धव ठाकरे व त्यांचे खासदार संजय राऊत यांनी त्याचं राजकारण करत राहावं? 2024 च्या निवडणुकीत जनताच त्यांना उत्तर देईल, असंही आमदार योगेश कदम यांनी यावेळी म्हटलं.

यावेळी शिवसेनेचे विधानसभाक्षेत्र प्रमुख प्रदीप सुर्वे, भगवान घाडगे, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, महिला आघाडीच्या रोहिणी दळवी,दीप्ती निखार्गे, चारुता कामतेकर,भगवान घाडगे,सचिन जाधव,युवा सेनेचे सुमित जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT