Bhaskar Jadhav : प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून ठाकरेंचे आमदार दाखवणार ताकद , कोकणात जय्यत तयारी

Shiv Sena : ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्याकडूनही 22 जानेवारीच्या सोहळ्याची तयारी
uddhav thackeray, Bhaskar Jadhav
uddhav thackeray, Bhaskar Jadhavsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri : अयोध्येला 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत. मात्र या सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे गटातील आमदार आपआपल्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तळ कोकणात आमदार वैभव नाईक यांच्या पाठोपाठ आमदार भास्कर जाधव यांनी देखील चिपळूण येथील आपल्या कार्यालयासमोर प्राणप्रतिष्ठापने निमित्त भव्य सोहळा आयोजित केला आहे.

uddhav thackeray, Bhaskar Jadhav
Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : भुजबळांच्या मतदारसंघात मराठा आंदोलकांना नोटीस; नेमकं काय घडलं...

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा क्षण आणि दिवस साऱ्या देशवासियांसाठी अत्यंत आनंदाचा असणार आहे. आम्ही देखील हा आनंदोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चिपळूण येथे साजरा करण्याचे ठरविले आहे. आपण सर्वांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav )आणि युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ज्यांना चिपळूण येथे येणे शक्य होणार नसल्यास त्यांनी आपआपल्या गावात भक्तीभावाने, श्रद्धेने आणि जोशपूर्ण वातावरणात सर्वांना बरोबर घेवून हा आनंदोत्सव साजरा करावा आणि हा दिवस अविस्मरणीय ठरावा. अशी देखील माझी आपणा सर्वांना विनंती आहे, असेही आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

शिवसैनिक लागले कामाला

बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक आघाडीवर होते. मात्र, राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा भाजपने हायजॅक केला आहे. या प्रकरणात भाजपने राजकारण करायला नको होते, अशी संतप्त भावना शिवसैनिकांमध्ये आहे. त्यामुळे कोकणात आपआपल्या गावात हा सोहळा मोठा प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिक कामाला लागले आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com