Nilesh Rane Vs Nitesh Rane sarkarnama
कोकण

Nilesh Rane : नितेश राणेंचा पलटवार जिव्हारी? नीलेश राणेंकडून 'ते' ट्विट डिलिट; कारणही सांगितलं; म्हणाले, 'एका भावाने...'

Mahayuti dispute bjp Nitesh Rane and shivsena Nilesh Rane face to face : निलेश राणे यांनी त्यांचे बंधू तथा मंत्री नितेश राणे यांच्यांत सध्या राजकीय तणाव वाढला आहे. मोठ्या भावाने दिलेल्या सल्ल्यावरून नितेश राणे यांनी टोला लगावल्याने यात आणखी भर पडली आहे.

Aslam Shanedivan

Ratnagiri News : भाजप मंत्री नितेश राणे धाराशिवच्या मेळ्याव्यात “कोणी कितीही ताकद दाखवली, कोणी कसेही नाचले, तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील. लक्षात ठेवा, सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य केलं होतं यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. याच वक्तव्यावरून शिवसेनेचे कुडाळचे आमदार आणि नितेश राणे यांचे बंधू नीलेश राणे यांनी एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी भावाला सबुरीचा सल्ला दिला होता. मात्र यावरून नितेश राणे यांनी पलटवार करताना उत्तर दिलं होतं. यानंतर आता नीलेश राणे यांनी ती पोस्ट हटवलीय. याचमुळे दोघां बंधुत राजकीय तणाव वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होता. याचवेळी नीलेश राणे यांनी आपण पोस्ट का हटवली याचे स्पष्टीकरण दिले आहे.

नितेश राणे यांनी धाराशिवच्या मेळ्याव्यात बाप काढल्यानंतर नीलेश राणे यांनी नितेश राणेंचे कानटोचले होते. त्यांनी, नितेश राणेंनी जपून बोलावं असा सल्ला देताना युती धर्म पाळावा, असे म्हटलं होते. यावरून नितेश राणे यांनी पलटवार करताना नीलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, असा टोला लगावला होता. ज्यानंतर आता नीलेश राणे यांनी आपले ट्विट हटवले असून दोघा राणे बंधूंमध्ये जुंपल्याचे दिसत आहे.

जो मेसेज द्यायचा होता तो...

यावेळी नीलेश राणे यांनी आपण ट्विटका डिलिट केलं याचे स्पष्टीकरण देताना, माझं ते ट्विट म्हणजे एका भावाने दुसर्‍या भावाला दिलेला सल्ला होता, असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी मी केलेले ते ट्विट अधिकार वाणीने केलेलं होतं. नितेश हा माझा लहान भाऊ आहे आणि त्याने मला वडिलांप्रमाणे मान दिलेला आहे. त्याला हक्काने मी बोललो.

पण आता मी ते ट्विट डिलीट केलं कारण मला जो त्यातून मेसेज द्यायचा होता तो मी दिलाय. याआधीही असे अनेक ट्विट आपण डिलीट सुद्धा केली आहेत. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. उबाठाला यातून काही फायदा घेण्यासारखं काही नाही. एका भावाने एका भावाला दिलेला हा सल्ला होता, असेही स्पष्टीकरण नीलेश राणे यांनी दिला आहे.

काय होतं नीलेश राणेंच्या ट्विटमध्ये

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर नीलेश राणे यांनी एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी, नितेश जपून बोलावं... मी भेटल्यावर बोलेनच. पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं असतं. पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असाही सल्ला नीलेश राणेंनी दिला होता.

त्यांच्या पोस्टवर नितेश राणे यांनी मिश्कील प्रतिक्रिया देणारी रीपोस्ट केली होती. त्यात त्यांनी, निलेशजी तुम्ही tax free आहात, असे त्यांनी म्हटले होते. यानंतरच नीलेश राणे यांनी आपली पोस्ट डिलिट केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT