Pratap Sarnaik Narendra Mehta  Sarkarnama
कोकण

Shivsena vs BJP : भाजप नेत्याची आमदारकी रद्द करण्यासाठी शिवसेनेतून लागली फिल्डिंग : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचे CM अन् राज्यपालांना पत्र

Pratap Sarnaik seeks action against BJP MLA Narendra Mehta over the Mira-Bhayandar civic controversy : पत्रकारांना मारहाण आणि महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी घेराव घातल्याच्या प्रकरणावरून सरनाईक आक्रमक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांना पत्र लिहून कारवाईची मागणी.

Pradeep Pendhare

Pratap Sarnaik Narendra Mehta controversy : एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या नगरसेवकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांना पत्र लिहून भाजप आमदार मेहता आणि नगरसेवकांचे पद रद्द करण्याच मागणी केली आहे. मंत्री सरनाईक यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मिरा-भाईंदरमध्ये भाजप काहीसा बॅकफूटवर गेला आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेत नागरिक व पत्रकारांना मारहाण केल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या घराला रात्रीच्या वेळी भाजप (BJP) आमदार नरेंद्र मेहतांसह भाजपच्या काही नगरासेवकांनी घेराव घातला होता. यावरून एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक चांगलेच संतापले आहेत. मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना पत्र लिहून मेहता आणि त्यांच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर आगपाखड केली आहे.

महापालिकेच्या महासभेच्या कामकाजाचे मोबाईलमधून चित्रीकरण केल्याच्या संशयावरून भाजप नगरसेवकांनी नागरिकांसह पत्रकारांना मारहाण केली होती. त्याच मध्यरात्री आमदार नरेंद्र मेहता व भाजपच्या नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या घरी धडक दिली. यावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी, ‘आयुक्त त्यांच्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह घरात विश्रांती घेत असताना आमदार नरेंद्र मेहता हे 40 ते 50 नगरसेवक आणि शेकडो उपद्रवी कार्यकर्त्यांचा जमाव घेऊन आयुक्तांच्या निवासस्थानी धडकले आणि संपूर्ण घराला वेढा घातला. त्यांनी ज्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आयुक्तांवर दबाव आणणे हाच यामागचा उद्देश होता,’ असा आरोप केला आहे.

पोलिस आयुक्त स्वतः घटनास्थळी धाव गेल्याने त्यांनी उन्मादी जमावाला शांत केले, या आधीदेखील आमदार मेहता व त्यांच्या नगरसेवकांनी अशाच प्रकारे झुंडशाही व गुंडगिरी केली आहे, असा घणाघात देखील मंत्री सरनाईक यांनी केला.

दरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांना विचारले असता पालिका आयुक्तांना रात्री भेटणार असल्याची पूर्व कल्पना देऊन त्यांची भेट घेतल्याचे सांगितले. या प्रकरणात जे नगरसेवक घटनास्थळी उपस्थित नव्हते, त्यांचीही नावे गोवण्यात आली आहेत. याची कल्पना आयुक्तांना देण्यात आली. यावेळी पोलिस आयुक्तदेखील उपस्थित होते, असा खुलासा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT