

Jantar Mantar protest foreign funding claim : "हू इज दीपके, असे म्हणत जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला परदेशी निधी पुरवला जात असून, देशात अराजकता माजविण्याचे काम सुरू आहे.
तिरंगा रॅली काढताना कशाला परवानगी हवी? वर्तमानपत्रांनी या अराजकतेमागील खरे वास्तव समाजासमोर आणणे ही काळाची गरज आहे," असे परखड मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
(कै.) यशवंत पाध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने ‘सकाळ’चे शिर्डी प्रतिनिधी सतीश वैजापूरकर यांचा सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे होते. यावेळी शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, लेखक डॉ. संजय कळमकर, ‘सकाळ’चे सहसंपादक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, "ज्या लोकांनी 40 वर्षे समाजकारणात आणि राजकारणात योगदान दिले, त्यांचे कार्य काहीच नाही का? आज सोशल मीडियातून (Social Media) अचानक समोर आलेल्या काही चेहऱ्यांमुळे देशात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत आहे. यामागे नेमकी कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे, हे शोधणे गरजेचे आहे. बांगलादेशात आंदोलन केलेल्या तरुणीने भारतात येऊन त्याच धर्तीवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करणे हा कोणता प्रकार आहे? तुम्हाला भारतालाही बांगलादेश बनवायचे आहे का?"
दरम्यान, सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतातून विनोदी शैलीत आजच्या काळातील बातमीदारीचे वास्तव आणि त्यापुढील आव्हानांवर मार्मिक भाष्य केले. प्रकाश पाटील यांनी सतीश वैजापूरकर यांच्या बातमीदारीचे विविध पैलू उलगडले. स्थानिक बातम्यांसोबतच जिल्हा व राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वृत्तपत्रात कशा येतील, यासाठी ते सतत जागरूक असतात, असे सांगत इतर बातमीदारांनीही त्यांच्या अभ्यासू कामाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
डॉ. कळमकर म्हणाले, वैजापूरकर साखरसम्राटांच्या कार्यक्षेत्रात बातमीदारी करीत आहेत, यात त्यांची कसब आहे. कारखानदारांसोबत राहणे म्हणजे वाघाच्या सोबत राहण्यासारखे आहे. यावर वैजापूरकर यांनीही मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले, आज तुमच्या शेजारीच वाघ बसला आहे. यावर मंत्री विखे पाटील यांनी लगेच "पण हा वाघ शाकाहारी आहे" असे प्रत्युत्तर देताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.