Mayor Elections  sarkarnama
कोकण

Mayor Elections : ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय! माजी आमदारांच्या सूनबाईंना उतरवलं नगराध्यक्षपदाच्या रिंगणात, महायुतीची डोकेदुखी वाढली

Konkan politics : सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाले असून शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Aslam Shanedivan

  1. ठाकरे शिवसेना गटाने आगामी पालिका निवडणुकीसाठी सिमा मठकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.

  2. सिमा मठकर या माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांच्या स्नुषा असून त्या राजकीय वारसा पुढे नेत आहेत.

  3. या घोषणेमुळे ठाकरे गटाने पालिकेतील निवडणुकीचा बिगुल फुंकला असून स्थानिक राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत स्वबळाच्या घोषणांचा सूर अधिकच तीव्र झाला आहे. एकीकडे भाजपने आधीच स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देखील दंड थोपटण्यात आले आहेत. यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अशातच सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निश्चित झाल्याने भाजपसह शिंदेंची शिवसेना आणि प्रमुख विरोधक असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सी खेच दिसून येत आहे.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महायुती झाल्यास नगराध्यक्षपदाची उमेदवारी झाल्यास नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला मिळणार, या प्रश्नामुळे इच्छुकांसह राजकीय पक्षांमधील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे नगराध्यक्षपद कोणाला याबद्दल जोरदार चर्चा सुरू असतानाच शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने दावा केला आहे.

यामुळे महायुतीत सध्या फूट पडली आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेनं पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष पदासाठी नाव जाहीर केले आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या लढतीच्या शर्यतीत सीमा मठकर यांना पसंती मिळाली असून शिवसेनेकडून त्यांचे नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे येथे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर शहर संघटक निशांत तोरसकर यांनी पत्रकार परिषद घेत सिमा मठकर यांचे नाव जाहीर केले आहे.

पालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच ठाकरे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचे नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार असून नगरसेवक पदांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केल्याचेही तोरस्कार यांनी स्पष्ट केले आहे. तर माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांच्या स्नुषा सिमा मठकर यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आले आहे.

तोरस्कार पुढे म्हणाले, "पालिकेची निवडणूक लढवताना मित्र पक्षांना दुखावणार नाही. मात्र, अद्याप तरी त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची समन्वयाची भूमिका निभवताना दिसत नाही. ते जेव्हा येतील त्यावेळी उमेदवारी वाटाघाटीसाठी चर्चा केली जाईल. परंतु, सध्या तरी आम्ही पूर्ण ताकदीनीशी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं असून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा ठाकरे शिवसेनेचाच असावा, असा एकमुखी निर्णय शहर कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे.

आघाडी झाल्यास नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा ठाकरे शिवसेनेचाच असणार आहे. त्यासाठी आम्ही मठकर यांचे नाव एक मताने ठरवले असून लवकरच त्यांचा ठाकरे शिवसेनेमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात येणार आहे.नगराध्यक्षपदासाठी आम्ही मठकर यांना विनंती केली आहे. त्या देखील इच्छुक आहेत. माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांचा वारसा त्यांना लाभला आहे. शिवाय त्यांचे सामाजिक कार्य सुद्धा चांगले आहे. प्रशासकीय ज्ञान त्यांना असल्याचेही तोरसकर पुढे म्हणाले.

मठकर 2016 ला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक होत्या. परंतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या अपक्ष निवडणूक लढल्या. यावेळी ठाकरे शिवसेनेकडून समोरून विचारणा करण्यात आली होती. आताही शिवसेनेनं माझी कुवत ओळखून तशा प्रकारची विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन निवडणूक लढवण्याचा विचार केला असून लवकरच ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मठकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सावंतवाडी शहरात नगरपालिका निवडणुकीसाठी वीसही उमेदवार तयार आहेत. चार महिला उमेदवार इच्छुक असून युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले या नगराध्यक्ष पदासाठी चांगल्या उमेदवार आहेत. आम्ही स्वबळाची तयारी केली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील असे भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी भाजपकडुन मोहिनी मडगावकरही इच्छुक असल्याचे समोर येत आहे.

FAQs :

1. सिमा मठकर कोण आहेत?
सिमा मठकर या माजी आमदार (कै.) जयानंद मठकर यांच्या स्नुषा असून ठाकरे गटाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत.

2. ठाकरे सेनेने सिमा मठकर यांना उमेदवार का घोषित केलं?
त्या स्थानिक पातळीवर लोकप्रिय असून जयानंद मठकर यांच्या राजकीय वारशाशी जोडल्या गेल्या आहेत.

3. ही घोषणा कोणत्या निवडणुकीसाठी करण्यात आली आहे?
ही घोषणा आगामी पालिका निवडणुकीसाठी करण्यात आली आहे.

4. सिमा मठकर कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार आहेत?
त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

5. या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात काय बदल होऊ शकतो?
या निर्णयामुळे ठाकरे गटाला स्थानिक स्तरावर बळ मिळण्याची आणि विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT