
तळ कोकणात महायुतीतील संघर्ष आणखी वाढला असून नारायण राणे नाराज आहेत.
त्यांच्या परवानगीशिवाय पक्ष प्रवेश होत असल्याने वाद पेटला आहे.
भाजप जिल्हाध्यक्षांनी कुडाळ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे निलंबन केले.
भाजप राणेंचं खच्चीकरण करत असल्याची चर्चा जोर धरते आहे.
रवींद्र चव्हाण यांनी राणेंची भेट घेतल्यामुळे चर्चांना नवा वेग आला आहे.
Sindhudurg News : तळ कोकणात सध्या महायुतीत वाटाची ठिणगी पडली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला अंगावर घेण्याची एकही संधी सोडत नाही. तर दुसरीकडे तळ कोकणात खासदार नारायण राणेंना भाजपचेच नेते मानायला तयार नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मला विचारल्याशिवाय भाजपच काय तर महायुतीतील मित्र पक्षांनीही पक्ष प्रवेश करू नयेत असा दमच राणेंनी भरला होता. मात्र त्यांना डावलूनच दोन्ही जिल्ह्यात सध्या पक्ष प्रवेश होत असल्याची चर्चा आहे. यात नुकताच परब यांच्या झालेल्या प्रवेशाने आगीत तेल ओतण्याचे काम केलं आहे. तर ती आग आणखी भडकवण्याचे काम भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी केले आहे. त्यांनी कुडाळच्या नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांचे निलंबन केले आहे. यामुळे भाजपच नारायण राणेचं खच्चीकरण करतंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खासदार राणेंची भेट घेतली. या भेटीमुळे आता चर्चांना उधान आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे भाजप असेच समिकरण तयार झाले आहे. यामुळेच जिल्ह्यात एकाच घरात खासदार, पालकमंत्री आणि आमदारकी आली आहे. मात्र एकाच घरात दोन पक्ष झाल्याने वाद निर्माण होण्याची शक्यात व्यक्त केली जात होती. आता तसेच होताना दिसत आहे. आमदार निलेश राणे असणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसात वाद सुरू आहे. याच वादात भाजपवालेच खासदार नारायण राणेंचं खच्चीकरण करण्यात पुढे असल्याचे दिसत आहे.
नुकताच विशाल परब यांच्या प्रवेशाने भाजपने एकाच वेळी दोन संकेत दिले आहेत. एक तर कुरघोडी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात ताकद वाढवली आहे. दुसरे म्हणजे स्वपक्षातील तगडे नेतृत्व खासदार नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याकडे वाटचाल केल्याची चर्चा आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जवळ असणाऱ्या परब यांचा मुंबईत प्रवेश झाला असून फक्त प्रवेशच झाला नाही तर चव्हाण यांनी पक्ष वाढीसाठी आपण सर्व ते मार्ग अवलंबू असे सांगितले आहे. तसेच परब यांना ताकद देवू असेही आश्वासन दिले आहे. त्यांच्या या आश्वासनामुळेच भाजपनेच राणेंच्या खच्चीकरणासाठी पावले टाकल्याचे बोलले जात आहे.
अशातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत खासदार नारायण राणे यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून चर्चांना उधान आले आहे. चव्हाण यांनी राणेंची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. राणे यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. आता त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी राणेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
प्र.१: तळ कोकणात महायुतीत वाद का निर्माण झाला?
उ. पक्ष प्रवेश आणि निलंबनाच्या कारवाईमुळे नारायण राणे व भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला.
प्र.२: नारायण राणेंची नाराजी कशामुळे आहे?
उ. त्यांच्या परवानगीशिवाय कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेश दिल्यामुळे ते नाराज झाले आहेत.
प्र.३: भाजप जिल्हाध्यक्षांनी कोणती कारवाई केली?
उ. त्यांनी कुडाळ नगराध्यक्ष आणि पाच नगरसेवकांचे निलंबन केले.
प्र.४: रवींद्र चव्हाण यांनी काय पाऊल उचलले?
उ. त्यांनी नारायण राणेंची भेट घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
प्र.५: या संघर्षाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
उ. महायुतीतील अंतर्गत फूट वाढून आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.