Raj Thackeray and Uddhav Thackeray  Sarkarnama
कोकण

Bhaskar Jadhav : मनसे-शिवसेना एकत्र! भाजप हादरली? ठाकरे ब्रँडवरून टीका करणाऱ्या प्रसाद लाडांवर भास्कर जाधवांचाही पलटवार

Bhaskar Jadhav On BJP MLA Prasad Lad : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे ब्रँड संपुष्टात आणण्याचा दावा करत टोला लगावला. मात्र, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पलटवार करत, भाजप ठाकरे ब्रँड मान्य करत असल्याचं सांगितलं.

Aslam Shanedivan

Summary :

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि मनसेच्या युतीने मुंबईत राजकीय वातावरण तापवलं आहे.

  • भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे ब्रँड संपुष्टात येईल असा दावा केला.

  • आमदार भास्कर जाधव यांनी पलटवार करत ठाकरे ब्रँड अजूनही प्रभावी असल्याचं स्पष्ट केलं.

Ratnagiri News : राज्यात आगामी स्थानिकच्या तोंडावर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढले आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्याने स्थानिकच्या आधीच युती झाल्याची चर्चा रंगली आहे. तर यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेना आणि मनसेच्या युतीवर भाजप आमदार प्रसाद लाड टीका करताना दिसत आहेत. त्यांनी, ठाकरे ब्रँड आता बंद होण्याच्या मार्गावर असून आम्ही तो बंद करू. ठाकरे ब्रँडला पहिल्या निवडणुकीलाच पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या दाव्यानंतर आता शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी लाड याच्यावर हल्लाबोल करताना, ठाकरे ब्रँड मुंबईतून नष्ट करू असे कोणतरी बोलतं याचा अर्थ ठाकरे ब्रँड आहे हे भाजपने मान्य केलं आहे, असा टोला लगावला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. महायुतीसह उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीला सुरूवात केली आहे. यात भाजपने मुसंडी मारली असून राज्यात विविध ठिकाणी पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. यात शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीही मागे नाही.

मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला राज्यभर गळती लागली आहे. ही गळती काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूच्या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता भाजपकडून टीका सुरू झाली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्द्यावरून टीका करताना ठाकरे ब्रँड मुंबईतून संपला असून त्यांना पहिल्या निवडणुकीलाच पराभवाला सामोरं जावं लागणार आहे, असा दावा केला आहे. तर लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीत असून हा बँड आम्ही या निवडणुकीत बंदच करू असाही इशारा त्यांनी दिली आहे. लाड यांनी, आता राज्यात स्वदेशी माल चालणार असून ठाकरे बँड आम्हीच बंद करणार आहोत, असा दावाही केला. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापलं आहे.

याच टीकेचा समाचार आता शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी घेतला असून त्यांनी भाजपमधील कोणी तरी ठाकरे ब्रँड मुंबईतून नष्ट करू असे म्हणत आहे. याचा अर्थ ठाकरे ब्रँड आहे हे भाजपला मान्य आहे. ते हे मान्य करतात. आता तर ठाकरे बंधू एकत्र आले येतील. त्यामुळे ठाकरे ब्रँड नष्ट करायचे सोडाच त्यानादात आपणच नष्ट होऊ अशी भीती त्यांना आहे. या भीतीनेच अशी वक्तव्य भाजपचे नेते करत आहेत, असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.

भाजप पक्षात सर्वात जास्त वाईट कोण बोलतं याची सध्या स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. देशात सध्या सामाजिक सलोखा बुघविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने होताना दिसत आहे. हा एक छुपा अजेंडा असून तो मागील शंभर वर्षांपासून सुरू असल्याचा यावेळी केला आहे.

FAQs :

प्र.१: शिवसेना आणि मनसे कोणत्या कारणामुळे एकत्र आल्या?
उ: स्थानिक निवडणुकांसाठी आघाडी करण्याची रणनीती म्हणून.

प्र.२: प्रसाद लाड यांनी काय विधान केलं?
उ: ठाकरे ब्रँड संपुष्टात आणण्याचा दावा केला.

प्र.३: भास्कर जाधवांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ: ठाकरे ब्रँड अजूनही ताकदीने टिकून असल्याचं सांगत भाजपवर पलटवार केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT