Pradeep Purnekar latest update Sarkarnama
कोकण

Pradeep Purnekar latest update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; SIT कडून पिस्तूल अन् दोन चाकू जप्त

SIT recovers weapons thane murder investigation continues amid serious allegations victim son : मुख्य संशयिताकडून शस्त्रे जप्त केल्याची माहिती; मृताच्या मुलाचे राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्याबाबत गंभीर आरोप, पोलिसांकडून चौकशी सुरू.

Pradeep Pendhare

Pradeep Purnekar murder SIT investigation : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणात आतापर्यंत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पूर्णेकर यांच्या हत्येत वापरलेले पिस्तूल, दोन धारदार चाकू विशेष तपास पथकाने (SIT) जप्त केली आहे.

'एसआयटी'च्या या कामगिरीमुळे गेल्या 21 दिवसांपासून काहीसा सावकाश सुरू असलेल्या तपासाला गती आली आहे. दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी याप्रकरणात चौकशी होत असलेले एकनाथ शिंदे शिवसेनेचे राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिकच धक्कादायक वळणार पोहोचले आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणातील मु्ख्य संशयित आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याकडून कर्नाळा परिसराजवळील अज्ञात ठिकाणाहून हत्येत वापरलेले पिस्तूल आणि दोन धारदार मोठे चाकू एसआयटी पथकाने जप्त केली आहे. एसआयटीने या शस्त्राच्या जप्तीचा पंचनामा केला आहे.

ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस (Police) उपायुक्त तथा एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव यांनी, आरोपी संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू हे दोन्ही आरोपींची उद्यापर्यंत पोलिस कोठडी आहे. याच दरम्यान, राजेंद्र शिंदे यांची देखील चौकशी सुरू आहे. आतापर्यंत त्यांची पाचव्यांदा चौकशी झाली आहे, अशी माहिती दिली. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मयत प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची आज सांत्वनपर भेट घेतली. रामदास आठवले यांनी पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, मयत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम यांनी पत्रकार परिषद घेऊन, घटनेसंदर्भात गंभीर दावे केले. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राम पूर्णेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागितला आहे. ते म्हणाले की, "माझ्या वडिलांना जावून 22 दिवस झाले. ⁠पोलिसांच्या हाती काहीच लागले नाहीत. ⁠आम्ही पुरावे दिले पण पोलिसांनी काही केले नाही. पण ⁠मी मोठा खुलासा करणार आहे. ⁠या आधारे राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांना अटक झाली पाहिजे."

पुरावे जुळवण्यासाठी राम पूर्णेकरांकडून AIचा वापर

⁠राजेंद्र शिंदे आणि संतोष टल्ली यांचा एकत्र फोटो आहे, असा दावा करताना ⁠मी राजेंद्र शिंदे यांच्या फोटोला AI ने हेल्मेट घातले आणि पाचवा आरोपी हा अमित सिंग नसून तो राजा शिंदे आहे, असा खळबळजनक दावा राम पूर्णेकर यांनी केला. एक फोटो असा आहे की, ज्यात राजेंद्र शिंदे आणि निखिल यादव बंदूक देताना आहे. ⁠एका व्हिडिओत निखिल यादवला राजेंद्र शिंदे बंदूक चालवायला शिकवतोय, असेही खळबळजनक दावे राम पूर्णेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

राम पूर्णेकर यांचे खळबळजनक दावे

व्हिडिओत बॅग घेवून नाचतोय ती व्यक्ती कदम आहे. ते माझ्या बाजूला रहायचे आणि ते आमच्या घरची रेकी करत होते. राजेंद्र शिंदे यांच्या घराबाहेर एकाने राजेंद्र शिंदे याला हेल्मेट घालताना बघितले आहे. ⁠राजेंद्र शिंदे यांच्या मुळशी इथल्या गावी हे लोकं बंदूक चालवायला ट्रेनिंग घ्यायला जायचे. ⁠हल्ला करताना हेल्मेंट घातलेली व्यक्ती ही राजा शिंदे आहे, असे सांगून एकनाथ ⁠शिंदे साहेबांनी मला न्याय द्यावा, अशीही मागणी राम पूर्णेकर यांनी केली.

न्यायासाठी मुख्यमंत्र्यांवर राम पूर्णेकरांनी ठेवलाय विश्वास

⁠हे पुरावे मी वकिलांना दिले आहेत. ⁠या पेक्षा जास्त पुरावे मी पोलिसांना दिलेत. 20 दिवस फक्त आम्ही पुरावे देतोय. ⁠पण फक्त चौकशी सुरू आहे. ⁠युपी STF ने चौकशीत नगरसेवक निवडणूक मुळे हत्या झाली हे सांगितले. पण आपली पोलिस काहीच करत नाही. वडिलांच्या मृत्यूचे राजकारण केले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. ⁠ते मला भेटले तेव्हा बोलले होते, मी तुझ्या पाठीशी आहे, याचीही आठवण राम पूर्णेकर यांनी करून दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT